KYC Fraud : KYC करण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Fraud

KYC Fraud : KYC करण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक

जळगाव : मोबाईल बंद होणार आहे, अशी बतावणी करत केवायसी (KYC) करण्याच्या नावाखाली एकाची ९७ हजार ४९६ रुपयांत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. (person was cheated online under pretense of doing KYC by pretending that mobile phone about to be switched off jalgaon news)

सुनील अमृत पाटील (वय ५७) जळगाव शहरातील मुक्ताईनगरमध्ये कुटुंबीयासह वास्तव्याला आहे. ते खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. शनिवारी (ता. ४) दुपारी बाराला ते घरी असताना, त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला.

‘आपला मोबाईल बंद होणार आहे, तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे’, असे सांगून सुनील पाटील यांना ऑनलाईन फार्म भरण्याचे सांगितले. त्यानुसार पाटील यांनी ऑनलाईन माहिती भरली.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९७ हजार ४९६ रुपये ऑनलाईन परस्पर वर्ग करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सलीम तडवी तपास करीत आहे.