Jalgaon Crime News : पत्नीचा शारीरीक, मानसिक छळ; सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Domestic violance

Jalgaon Crime News : पत्नीचा शारीरीक, मानसिक छळ; सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

जळगाव : येथील सुप्रीम कॉलनीत माहेर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (Physical mental torture of wife case filed against in laws Jalgaon Crime News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Nashik Crime News : मालेगावला शालेय फीची रक्कम चोरणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

येथील नजरीन पिंजारी (वय २०) हिचा विवाह आसोदा येथील अश्‍पाक युनूस पिंजारी याच्याशी जुलै २०२१ मध्ये झाला. लग्नाच्या काही दिवसांतच पतीने विवाहितेला काहीही कारण नसताना टोचून बोलणे सुरू केले.

त्यानंतर शिवीगाळ आणि मारहाणही केली. शिवाय सासू, सासरे, जेठ, आतेसासू यांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी सुप्रिम कॉलनीत निघून आली.

रविवारी (ता. ८) दुपारी तीनला विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात पती अश्‍पाक पिंजारी, सासरे युनूस पिंजारी, सासू परवीनबी पिंजारी, जेठ शाहरूख पिंजारी आणि आतेसासू जमीलाबी इसाक पिंजारी (सर्व रा. आसोदा, ता. जि. जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक महेंद्रसिंग पाटील अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashi Crime News : गावठी दारू विक्री करणाऱ्यास अटक