Fraud Case : आयजींच्या पथकाकडून मुन्नाभाई डॉक्टरला अटक

fraud doctor
fraud doctoresakal

जळगाव : भुसावळ शहरात बेकायदेशीर (Illegal) व विनापरवाना दवाखाना चालवून औषधी विक्री करणाऱ्या ‘मुन्नाभाई’ डॉक्टरला विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या पथकाने अटक केली आहे. (Police arrested fraud doctor who was running an illegal and unlicensed dispensary selling medicines jalgaon news)

संशयिताकडून विनापरवाना औषध विक्रीची एकूण २३ हजार ८६८ रूपयांची औषधी व इतर वैद्यकीय साहित्य हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळमधील शिवाजीनगरातील सुरभी कॉम्प्लेक्स येथे संशयित शमशीर कादिर शेख (वय ४१, रा. कौसा मुंब्रा, ठाणे) हा विनापरवाना बीयूएमएस डॉ. असलेले डॉ. शेख अमजद शेख अहमद (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांच्या नावाने रजिष्ट्रेशन केलेले सर्टिफिकेट लावून डॉक्टरच्या नावाखाली रुग्णांना चुकीची औषध देत असल्याची गोपनीय माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या पथकाला मिळाली.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

fraud doctor
BHR Extortion Case : सूरज तेजसच्या मैत्रीने उघडे पाडले खंडणीचे सिंडिकेट

त्यानुसार पथकाने बुधवारी (ता. ८) दुपारी चारला धडक कारवाई केली. पथकाने संशयित शमशीर कादिर शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विनापरवाना विक्रीसाठी आणलेले २३ हजार ८६८ रूपये किंमतीच्या औषधींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आरोग्य अधिकारी बाळासाहेब बावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शमशिर शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud doctor
Jalgaon News : कुसुंब्यात तरुणाची आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com