Jalgaon News : कुसुंब्यात तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Jalgaon News : कुसुंब्यात तरुणाची आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथील २१ वर्षीय तरुणाने (Youth) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गोविंदा गोपाल पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. (21 year old youth from Kusumba committed suicide by hanging himself in his residential house Jalgaon news)

गोविंदा पवार (रा. लखानवाडा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) हा तरुण सध्या कुसुंबा (ता. जळगाव) येथे शांताराम अभिमन कोळी यांच्या घरात भाड्याने वास्तव्याला होता. गेल्या दहा दिवसांपासून गोविंदा पवार कामाच्या शोधात होता.

गोविंदा पवार याने मंगळवारी (ता. ७) मध्यरात्री घरात कुणीही नसताना लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (ता. ८) सकाळी आठला शेजारी राहणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

याबाबत मिळोलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा केला व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :JalgaoncrimedeathYouth