Latest Marathi News | पोलीस भावाकडून बहिणीला जीवेठार मारण्याची धमकी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime

Jalgaon Crime News : पोलीस भावाकडून बहिणीला जीवेठार मारण्याची धमकी !

जळगाव : शहर वाहतूक शाखेत कार्यरत पोलिस भावाकडून सख्ख्या बहिणीला ठार करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी बहिणीने तक्रार दिल्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

तक्रारदार बहीण संघमित्रा सुपडू शिंगारे (वय ४२, रा. संभाजीनगर, गाडगेबाबा चौक) येथे वास्तव्यास आहेत.

त्यांचा सख्खा भाऊ महेंद्र शिंगारे पोलिस नाईक म्हणून भुसावळ शहर वाहतूक शाखेत कार्यरत असून, काही दिवसांपासून बहीण-भावामध्ये कौटुंबिक वाद आहे.(Police brother threatens to kill sister Jalgaon Crime News)

हेही वाचा: Health news : अपघातात जखमी रुग्णाला 3 शस्त्रक्रियांद्वारे जीवनदान

याच वादातून महेंद्र शिंगारे याने (ता. ३१ ऑगस्ट) दुपारी तीनला बहीण संघमित्रा शिंगारे यांना फोनवरून शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिनाभरानंतर बहिणीने तक्रार दिल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोलिस भावाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार संजय चौधरी तपास करीत आहे

हेही वाचा: तुम्ही घ्या पगार अन् आम्ही खातो शिव्या ! महासभेत सुस्त प्रशासना वर नगरसेवकांची आग

टॅग्स :Jalgaonpolicebrother