Jalgaon News : फुले मार्केट दमदाटी प्रकरण; कथित ‘दादां’ ची मार्केटमधून धिंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Police busted gangsters who harassed traders in Phule Market

Jalgaon News : फुले मार्केट दमदाटी प्रकरण; कथित ‘दादां’ ची मार्केटमधून धिंड

जळगाव : शहरातील फुले मार्केट परिसरात हॉकर्स आणि व्यापाऱ्यांच्या वादाच्या पाश्‍र्वभूमीवर व्यावसायिकांना धमकावणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. या कथित ‘दादां’ची शुक्रवारी (ता. ३) सकाळी दहाला फुले मार्केटमधून पायी धिंड काढली.

महात्मा फुले मार्केटमध्ये अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. अनेकदा कारवाईचा देखावा करून अतिक्रमण काढले जाते. मात्र, नंतर ते पूर्ववत होते.

गुरुवारी (ता. २) सकाळी दहाच्या सुमारास एका व्यापारी त्याचे दुकान उघडत असताना, चाकू दाखवत दमदाटी व धमकावले होते. त्यामुळे संतप्त दुकानदारांनी दुपारपासून फुले मार्केट बंद ठेवून निषेध करत महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. (Police busted thugs who harassed traders in Phule market Jalgaon News )

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पोलिसांची दबंगगिरी

दमदाटी व धमकावण्यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नव्हती. शहर पोलिसांत दुपारी कोणत्याच व्यापाऱ्याने तक्रार दिली नव्हती. सायंकाळी एक व्यापारी दुकानातून डब्बा घेत असताना, दोघांनी त्याला धमकावले होते. याप्रकरणातही कुणीही पोलिसांत तक्रार दिली नाही.

यांची काढली धींड

शुक्रवारी सकाळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, शोध पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी धमकी देणाऱ्या मनीष अरुण इंगळे (वय १८) व गणेश ऊर्फ डेब्या दिलीप सोनवणे (२०, दोघे रा. वाल्मीकनगर) यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून फुले मार्केट परिसरातून धिंड काढली.