लाकडाची चोरटी वाहतूक पकडली; ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टरला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
crime news
crime newsesakal
Updated on

चाळीसगाव (जि. जळगाव) : जीवंत झाडाची कत्तल करून अवैध लाकूडची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील वाघळी चौफुलीवर बुधवार (ता. ८) रोजी पकडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टरला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील वडाळा- वडाळी गावाकडून वाघळीकडे अवैध निबांच्या झाडाची कत्तल करून चोरटी वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. त्यानुसार पथकाला रवाना करण्यात आले असता त्यावेळी वाघळी चौफुलीवर अवैध लाकडाची वाहतूक करताना चालकासह ट्रॅक्टर (एम.एच.१९ बीजी ५३७२) मिळून आला. त्यावरील चालकाला त्याचे नाव पोलिसांनी विचारले असता त्यांनी अलताफ अली नवाब अली (वय, ४० रा. वागळी) असल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी ट्रॅक्टरासह चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. व पुढील कारवाईसाठी ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग यांना रिपोर्टद्वारे ताब्यात दिलेत.

crime news
पत्नीचा गळा चिरून पतीची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कातकाडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना शांताराम सिताराम पवार, पोना संदिप पाटील, पोना जयंत सपकाळे आदींनी केली आहे.

crime news
Nashik : आधी करोडोची माया घशात, नंतर शुल्क बुडवून शासनाला चुना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com