
Nashik : आधी करोडोची माया घशात, नंतर शुल्क बुडवून शासनाला चुना
नाशिक : दसक शिवारात इनाम जमिनीची नोटरीद्वारे (Notary) विक्री करून करोडो रुपयांची माया घशात घालणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या वेशातील भूमाफियांनी (Land Mafia) महापालिकेत (NMC) नगरसेवक (Corporator) म्हणून काम करताना नगररचना विभागाचे (Town Planning Department) करोडो रुपयांचे विकास शुल्क बुडवून महापालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले. चुकीच्या पद्धतीने जमिनीचा व्यवहार करून शासनाची जमीन हडपण्याबरोबरच शासनाचे करोडो रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडविले. पाठोपाठ महापालिकेच्या नगररचना विभागाचे विकास शुल्क तर बुडविले. उलट अतिक्रमित (Encroachment) जागेवर रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी सुविधा पुरवून आणखीनच खड्ड्यात घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (NMC corporators land corruption Nashik Corruption News)
दसक शिवारातील सर्व्हे क्रमांक ७८, ७९ मध्ये जवळपास २७ एकरातील २९ गटांच्या इनामी जमिनी चुकीच्या पद्धतीने व्यवहार करून रोख स्वरूपात करोडो रुपयांची माया जमणाऱ्या माजी नगरसेवक व कथा कथित लोकप्रतिनिधींनी शासनाचे जमीन हडप करून करोडोंची माया जमविली. याशिवाय शासनाचा स्टॅम्प ड्यूटीसह अन्य करून करोडो रुपयांचे नुकसान केले आहे. ज्या जमिनींवर चुकीच्या पद्धतीने व्यवहार केले, त्या जागेवर महापालिकेची परवानगी न घेता पक्की बांधकामे करण्यात आल्याने त्या माध्यमातून नगर विकास शुल्कावरदेखील डल्ला मारला आहे.
हेही वाचा: Corona Updates : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाची थाप; 8 दिवसात 4 रुग्ण
२७ एकर क्षेत्रावर अनधिकृत पक्के बांधकाम करताना हीच व्यवहार नियमित झाले असते तर करोडो रुपयांचे विकास शुल्क महापालिकेच्या नगररचना विभागाला प्राप्त होऊन शहरात विकासाची कामे झाली असती. परंतु, अधिकृत शुल्क तर सोडाच उलट अनधिकृत बंगले उभारलेल्या जागांवर रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेजलाइन सारख्या सुविधा पुरवून महापालिकेलाही आर्थिक खड्ड्यात घातले आहे. ज्यांनी अशा प्रकारचे व्यवहार केले, त्यातील काही तथाकथित लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक व नगरसेविकेचे पती असल्याने महापालिकेत काम करताना लुटारू म्हणूनच त्यांची भूमिका राहिली, असे आता उघडपणे बोलले जात आहे.
हेही वाचा: Nashik : 18 वर्षांपुढील 77 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण
Web Title: Nmc Corporators Land Corruption Nashik Corruption News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..