पोलिसांचा ऑनलाइन मटक्याच्या अड्ड्यावर छापा, सापडली अख्खी बँक; दोघे गजाआड | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online gamblers

पोलिसांचा ऑनलाइन मटक्याच्या अड्ड्यावर छापा; सापडली अख्खी बँक

अमळनेर (जि. जळगाव) : शहरात ऑनलाइन मटकासह (Online matka) इतर जुगार (Gambling) चालवून शासन व नागरिकांची फसवणूक (Cheating) करणाऱ्या १८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, दोन संशयितांना अटक केली आहे.

अबब...इथे तर सापडली अख्खी बँक

पवन चौकातील बोरसे गल्लीत ऑनलाइन मटका जुगाराचे वेबसाइट बनवून जुगार चालवत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळली. त्यावरून निरीक्षक हिरे, उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, हवालदार किशोर पाटील, महिला कर्मचारी रेखा ईशी, नम्रता जरे, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे, रवींद्र पाटील, आशिष गायकवाड, रवींद्र पाटील, अमोल पाटील, नीलेश मोरे, अतुल मोरे यांनी मंगळवारी (ता. ११) सायंकाळी बोरसे गल्लीत हरचंद भिला पाटील यांच्या घरात छापा टाकला असता, एका पत्र्याच्या खोलीत लॅपटॉप, चार मोबाईल, २० डायऱ्यांवर ऑनलाइन जुगाराची वेबसाइट, व्हॉट्सॲप, मेलद्वारे मिलन, कल्याण जुगार व सट्टा जुगाराचे आकडे खेळविताना जयंत पाटील (रा. श्रीकृष्ण मंदिर) व फिरोजखान नसीमखान पठाण (रा. अंदरपुरा, सराफ बाजार) मिळून आले.

हेही वाचा: जळगाव : विलगीकरणाचा कालावधी आता सात दिवसांवर

तीन लाख सात हजार ६०० रुपयांची रोकड, २५ धनादेश, त्यात १४ चेक कोरे व इतर रकमा लिहिलेले, विविध गावच्या जमिनीचे लाखो रुपयांचे उतारे, बखळ प्लॉटच्या जागांचे उतारे, सौदा पावत्या, नोटा मोजण्याचे मशिन आदी मिळून आले. पोलिसांनी डायरी चेक केली असता, त्यात महाराष्ट्र राज्याबाहेर असलेले बुकी साई सचिन, डी. के. शहादा, प्रल्हाद, सुशील, बंटी, धनंजय, भवानी पटणाराम, मुकेश शेठ, प्रकाश शेठ, मनोज, ॲन्थनी, प्रायव्हेट, नरेश, राजधानी, राजू आणि सोबत त्यांचे मोबाईल क्रमांक आढळून आले. संपूर्ण चौकशीत ऑनलाइन लॉटरी, सट्टा, जुगार चालवून लोकांची फसवणूक करून शासनाचा महसूल बुडवून व लोकांना बेकायदेशीर व्याजाने पैसे देत असल्याचे आढळून आले. पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या फिर्यादीवरून फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, मुंबई जुगार कायदा, सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम १७, १२, ३९ प्रमाणे गुन्हा नोंदविला असून, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत. जयंत आणि फिरोजखान यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा: म्हणून अर्जुन कपूर मलायकाचं ब्रेक अप? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top