म्हणून अर्जुन कपूर मलायकाचं ब्रेक अप? सोशल मीडियावर रंगली चर्चा | Bollywood actor Arjun Kapoor actress Malaika Arora break up | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaika Arora Break up gossip
म्हणून अर्जुन कपूर मलायकाचं ब्रेक अप? सोशल मीडियावर रंगली चर्चा

म्हणून अर्जुन कपूर मलायकाचं ब्रेक अप? सोशल मीडियावर रंगली चर्चा

प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्यात ब्रेक अप झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सोशल मीडिय़ावर (Break up gossip on social media) रंगली आहे. दोन आठवड्यांपूर्वी हे जोडपं पर्यटनासाठी परदेशी गेलं होतं. तिथले फोटो व्हायरलही झाले होते. तोपर्यत सगळं आलबेल होतं. मात्र आता त्यांच्यात काही कारणास्तव बिनसल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. मलायका आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपची चर्चा सध्या सोशल मीडीयावर ट्रेंडिंगचा विषय आहे. अर्जुन कपूरला कोरोनाची बाधा झाली आहे. तो होम क्वॉरनटाईन आहे. दुसरीकडे मलायका तिच्या वेगळ्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबईतील पॅपराझीनं (arjun and malaika arora) काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअप विषयी चर्चा सुरु केली आहे. त्यावरुन त्यांनी मलायका आणि अर्जुनलाही वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. खरचं मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेक अप झालं आहे का...असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. य़ापूर्वी देखील मलायका आणि अर्जुन कपूरच्या ब्रेक अपची चर्चा रंगली होती. त्यावेळी नेटकऱ्यांनी त्या दोघांना अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते.

हेही वाचा: Viral Video : हे काय नवं खुळं! महिलेने चक्क केसांमध्ये गुंडाळला साप

याविषयीची माहिती आज सकाळी आहे. त्यांच काय आहे मलायकानं जाणीवपूर्वक मीडियापासून आपल्या नात्याला काही काळापासून लांब ठेवलं आहे. असं कळतं आहे. तिला सध्या थोडी स्पेस हवी आहे. शांतता हवी आहे. दुसरं कारण म्हणजे अर्जुन कपूरनं त्याच्या नव्या चित्रपटावर फोकस करावं यासाठी तिनं हे काही दिवसांपासून कॅमेरापासून लांब राहणं पसंत केलं आहे. अर्जुन कपूरचा लेडी किलर नावाचा चित्रपट येतो आहे. त्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे. बऱ्याचदा अर्जुनचा कोणताही नवा चित्रपट आला की, त्या चित्रपटाची चर्चा न होता त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा होत असते. त्यामुळे त्या चित्रपटावरचा फोकस जातो. आता तसे होऊ नये म्हणून मलायकानं काळजी घेतली आहे.

हेही वाचा: यंदाच्या वर्षी या बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रेटींच्या घरात हलला पाळणा...

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top