Jalgaon News : बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

Jalgaon News : बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

मेहुणबारे (जि. जळगाव) : शिवारात बिबट्याचे पशुधनावर हल्ले सुरूच आहेत. सोमवारी (ता. १९) पहाटे पुन्हा बिबट्याने कपाशीच्या शेतात बांधलेल्या वासरीला हजार फूट फरफटत नेत तिचा बळी घेतला. वन विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. (Vasari killed in leopard attack Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हेही वाचा: Nashik News : आर्थिक विवंचनेतून नवदाम्पत्याची गळफास घेत आत्महत्त्या!

वरखेडे-मेहुणबारे रस्त्यावरील वाघी नाल्याच्या रस्त्यापुढे असलेल्या भूषण संदीप चौधरी यांच्या शेतात गोठ्यातून दहा दिवसांपूर्वी एक गाय दोर कापून चोरीस गेली होती. त्यानंतर चौधरी यांनी आपली सर्व जानवरे कपाशीच्या शेतात बांधली होती. सोमवारी सकाळी चौधरी शेतात गेले असता, इतर गुरांजवळ बांधलेली वासरी दिसून आली नाही. तिचा शोध घेतला असता, एक हजार फुटावर वासरी मृतावस्थेत मिळून आली.

बिबट्याने वासरूला फरफटत नेत तिचे नरडे फोडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आठ ते दहा दिवसांपूर्वीही वरखेडे शिवरातही बिबट्याने एका बकरीचा फडशा पाडला होता. शेतात बांधलेल्या गुरांना बंदिस्त जागेत बांधावीत, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

हेही वाचा: Nashik News : दुचाकी अपघातात 2 गंभीर जखमी

टॅग्स :JalgaonLeopard