शिवसेनेवर टीका करूनच भाजप मोठा झाला; म्हणून त्यांना टिका करण्याचे तेच काम !

कैलास शिंदे
Wednesday, 6 January 2021

कापसाचे पैसे शेतकऱ्यांना लवकर मिळत नाही हे खर आहे. मात्र हमी व थकहमीच्या भावाचा विषय असतो, ती आता शासनाने घेतली.

जळगाव  : शिवसेनेवर टीका केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष मोठा होवूच शकत नाही. त्यामुळे त्यांना आमच्यावर टिका करावीच लागेल असे मत शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. 

आवश्य वाचा- नाव न घेता एकनाथ खडसे - गिरीश महाजनांची ‘तीरंदाजी’ तीव्र !
 

जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते.राज्यात भारतीय जनता पक्षातर्फे शिवसेनेवर जोरदार टिका करण्यात येत आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, कि भारतीय जनता पक्ष आमच्यावर टिक करूनच मोठा झाला आहे. आमच्यावर टिका केल्याशिवाय ते मोठे होवूच शकत नाही, त्यामुळे त्यांनी आमच्यावर टिका करायची नाही तर कोणावर करायची असा सवालही त्यांनी केला. 

 

कापसाचे पैसे लवकरच देणार 
कापूस विक्री केल्यानंतर शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने रक्कम मिळत नाही, याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना गुलाबराव पाटील म्हणाले, कापसाचे पैसे शेतकऱ्यांना लवकर मिळत नाही हे खर आहे. मात्र हमी व थकहमीच्या भावाचा विषय असतो, ती आता शासनाने घेतली असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पडतील असा विश्‍वासही त्यांनी त्यांनी व्यक्त केला. 

आवर्जून वाचा- भितीच संपली राव ! ठाण्यात पोलीसांसमोरचं ढिश्‍युम..ढिश्‍युम 
 

ग्रा.प.निडणूकीत कार्यकर्ता पक्षासोबत 
ग्रामपंचायत निवडणूकीबाबत बोलतांना, गुलाबराव पाटील म्हणाले,कि ग्रामपंचायतीच्या निवडणूका या चिन्हावर लढल्या जात नाहीत. मात्र त्यात पक्षाचे कार्यकर्ते सहभागी असतात. गावकी आणि भावकी यावरच ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यात येते. त्यामुळे निवडणूकीत हा कार्यकर्ता कोणासोबत असला तरी कार्यकर्ता हा पक्षासोबत कायम असतो. 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi news jalgaon Guardian Minister gulabrao patil criticizes shiv sena BJP