Political News : ''खडसेसाहेब, आम्ही तोंड उघडले, तर...''; गिरीश महाजनांचे खडसेंना प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish mahajan Statement on Eknath Khadse

Political News : ''खडसेसाहेब, आम्ही तोंड उघडले, तर...''; गिरीश महाजनांचे खडसेंना प्रत्युत्तर

जळगाव : एकनाथ खडसे वाळूंच्या हप्त्यावर बोलायला लागले आहेत, हे विषेश आहे. जळगाव जिल्ह्यात वाळू हप्ते कोण घेतो, हे सर्वांना माहीत आहे. त्या त्यामुळे त्यांनी अधिक बोलू नये. आम्ही तोंड उघडले, तर अनेक विषय पुढे येतील, असे स्पष्ट मत राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा: Girish Mahajan Statement : एकनाथ खडसेंना नाटक करण्याची गरज नव्हती

विधिमंडळात एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे, वाळू, हप्तेखोरी यावर सरकारवर चांगलेच आसूड ओढले. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की खडसेसाहेब वाळू हप्त्यावर बोलायला लागले आहेत. मी त्या वेळी सभागृहात नव्हतो.

मला उत्तर देण्याचा अधिकार नाही, पण आता विधिमंडळात उत्तर देऊ. ‘त्या’ पीआयने कशी आत्महत्या केली, त्याचा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत उल्लेख झाला आहे. हे सर्व उद्योग कोणाचे आहेत, कोण काय करतो, जिल्ह्यात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना विचार केला पाहिजे. लोकांना आता सर्व कळायला लागले आहे.

हेही वाचा: Eknath Khadse | गिरीश महाजनांनी अत्यंत खालची पातळी गाठली : एकनाथ खडसे

आम्ही जातिवाचक बोलणारे पीआय बकाले यांना पाठीशी घालत आहोत, हा श्री. खडसे यांचा आरोप चुकीचा आहे. कुणीही बकाले यांना पाठीशी घालत नाही. उलट आम्ही तर त्यांना समोर आणा, अशी मागणी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. याच बकाले ना कोणी आणले?, ते कोणाचे पिल्लू आहेत, हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे लोकांना सर्व कळत आहे. आम्ही तोंड उघडले, तर अनेक विषय पुढे येतील.

हेही वाचा: Eknath Khadse on Girish Mahajan : एकनाथ खडसेंचा महाजनांना सवाल | Politics