esakal | आणि 'ती'..म्हणाली, साहेब तुमचं कल्याण होवो !
sakal

बोलून बातमी शोधा

woman help

आणि 'ती'..म्हणाली, साहेब तुमचं कल्याण होवो !

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : तालुक्याचा सर्वोच्च अधिकारी किराणा (Grocery) , धान्याच्या पिशव्या आणि रेशनकार्ड (Ration card) घेऊन दारात उभा राहिल्याचे पाहून ती भांबावली. आपल्या अस्तित्वाच्या पुराव्यासह आयुष्यभराच्या अन्नाची सोय करून देणाऱ्या साहेबाच्या डोक्यावरून ओवाळत तिने कानशीलावर बोटे कडाकडा मोडली. तुमचं कल्याण होवो म्हणत मनापासून आशीर्वादही दिला. (government officer help poor woman with new ration card and grain)

हेही वाचा: नो टेंशन..म्युकरमायकोसिस आजारावर होणार मोफत उपचार !

तहसीलदार (Tehsildar) आबा महाजन कोविड 19 (Covid 19) च्या साथसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करीत 24 मेस अरुणावती नदीच्या काठावर खंडेराव मंदीर परिसरात पोहचले. तेथे फेरफटका टाकताना त्यांना मोडकळीस आलेली झोपडी दिसली. वादळ आणि पावसाचे वातावरण असतांना पडक्या झोपडीत कोण राहत याबाबत त्यांनी माहिती घेतली.

पतीचे निधन..

झोपडीत राहणाऱ्या प्रभाकर भावसार या पुरुषाचा आठवडाभरपूर्वी मृत्यू झाला असून तेथे केवळ भावसार यांची वृद्ध पत्नी राहत असल्याचे कळले. तिची भेट घेऊन तहसीलदारांनी तिच्याकडे उदरनिर्वाहाची काय सोय आहे याबाबत विचारणा केली. प्रधानमंत्री गरजू कुटुंब योजनेत धान्य मोफत मिळत असल्याचे सांगितले. मात्र तिने आपल्याकडे रेशनकार्ड नसल्याची माहिती दिली.

आणि तयार केले रेशनकार्ड

त्यांनतर तहसीलदारांनी तडक कार्यालय गाठले. युद्धपातळीवर संबंधित महिलेचे रेशनकार्ड तयार करून घेतले. पुरवठा निरीक्षण अधिकारी मायानंद भामरे यांच्यासोबत त्यांनी पुन्हा त्या महिलेची भेट घेतली.

हेही वाचा: हॉटस्पॉट ठरलेले स्मार्ट व्हिलेज..झाले कोरोनामुक्त !

धान्याच्या पिशव्या, आणि रेशनकार्ड

महिनाभराचा किराणा, धान्य भरलेल्या पिशव्या आणि नवेकोरे रेशनकार्ड त्यांनी महिलेच्या सुपूर्द केले. सहृदय आणि कार्यतत्पर अधिकाऱ्याची माणुसकी पाहून तिचे डोळे भरून आले. साहेब, तुमचं कल्याण होवो म्हणत तिने आशीर्वाद दिला. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजू टेलर, जनकल्याण प्रतिष्ठानचे विकास सेन उपस्थित होते.

(government officer help poor woman with new ration card and grain)