कंजरवाड्यात ट्रान्सफॉर्मर पेटले

आगीच्या विळख्यात सापडलेले ट्रान्स्फॉर्मर
आगीच्या विळख्यात सापडलेले ट्रान्स्फॉर्मर esakal

जळगाव : शहरातील कंजरवाडा येथील वीज ट्रान्स्फॉर्मरला अचानक आग लागली. परिसरातील रहिवाशांनी वीज मंडळासह अग्निशमन दलास पाचारण केल्यावर आग आटोक्यात आली.

कंजरवाडा येथील वीज ट्रान्स्फॉर्मरला सोमवारी (ता.३०) दुपारी चारच्या सुमारास अचानक आग लागली. ट्रान्स्फॉर्मरमधून ऑईल निघत असताना ही आग लागली. ट्रान्स्फॉर्मरमध्ये असणाऱ्या तप्त ऑईलमुळे आगीने रौद्र्य रूप धारण केले.

आगीची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे राहुल नेतलेकर यांनी तत्काळ अग्निशमन विभागासह वीज मंडळाला कळवले. थोड्याच वेळात अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वेळीच आग आटोक्यात आणण्यात आली.

आगीच्या विळख्यात सापडलेले ट्रान्स्फॉर्मर
राजेंद्रनगरात गॅस सिलिंडरचा स्फोट

जिल्हापेठ पॉवर हाऊस कक्षाचे अभियंता जयेश तिवारी, कर्मचारी महेश कळस्कर, लोंढे, नमो यांनी तातडीने वीजपुरवठा बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. परिसरातील नागरिकांसह अग्निशमन विभागाचे कर्मचारी वाहनचालक निवांत इंगळे, युसूफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे यांनी सहकार्य केले.

आगीच्या विळख्यात सापडलेले ट्रान्स्फॉर्मर
शिरपूर तालुक्यात अग्नी तांडव; वृद्ध महिलेसह 4 जनावरांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com