Jalgaon Crime News : मनपा अभियंता मारहाण प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक मारहाण प्रकरणातील संशयित भूपेश कुलकर्णी याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
crime
crimeesakal

Jalgaon Crime News : महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक मारहाण प्रकरणातील संशयित भूपेश कुलकर्णी याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

गटारीचे बांधकाम रोखण्यासह प्रभाग समिती कार्यालयात जाऊन भूपेश प्रकाश कुलकर्णी (देवेंद्र नगर, महाबळ परिसर) याने महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांना मारहाण केली होती. (pre arrest bail of accused in Municipal Engineer assault case was rejected jalgaon news)

या प्रकरणी कुलकर्णी याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुराणिक यांनी फिर्यादीनंतर प्रभाग समिती कार्यालयातील वादाप्रसंगी संशयित कुलकर्णी याने गटारीच्या वर्कऑर्डरची फाइल चोरुन नेल्याचे पुरवणी जबाबावरून कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेनंतर कुलकर्णी याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर गुरुवार (ता.८) फेब्रुवारीला कामकाज पूर्ण होऊन निकाल राखून ठेवण्यात आला होता.

crime
Nashik Fraud Crime : ATM मध्ये चिकट वस्तू लावून 33 हजार 500 रुपयांची फसवणूक...

काल शुक्रवारी जिल्हा व सत्र न्या. जे.जे. मोहिते यांनी दिला व यात कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. प्रसाद पुराणिक यांच्या वतीने ॲड. केतन ढाके यांनी तर भूपेश कुलकर्णी यांच्यातर्फे ॲड. आकील इस्माईल यांनी कामकाज पाहिजे.

सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. भारती खडसे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान पोलिसांनी आता आरोपी भूषण कुळकर्णी याला अटक करावी अशी मागणी महापालिका अभियंता योगेश बोरोले यांनी केली आहे.

crime
Nagpur Crime: नागपुर हादरले! चोवीस तासांत तीन खून, उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून युवकांचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com