गर्भवतीसह भाचीचा तलावात बुडून मृत्यू

pregnant Women With Niece Drowning the lake Death
pregnant Women With Niece Drowning the lake Deathsakal

सोनगीर : पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या नंदाणे (ता. धुळे) येथील गर्भवती महिला व तिच्या भाचीचा रविवारी (ता. १३) सकाळी साडेदहाच्या सुमारास पाझर तलावात बुडून मृत्यू झाला.

सुंदरबाई समाधान होलार (वय २१) व शिवानी आबा होलार (वय ७, रा. नागद, ता. चाळीसगाव) अशी दोघींची नावे आहेत. याप्रकरणी येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. नंदाणे गावालगतच जुना पाझर तलाव असून, तेथे सुंदरबाई व तिच्या नणंदेची मुलगी शिवानी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

सुंदरबाई कपडे धुवत असताना जवळच असलेल्या शिवानीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात सुंदरबाईचा तोल जाऊन पाण्यात पडली. हा प्रकार जवळच शेतात जनावरे चारणाऱ्या आबा भिल याच्या लक्षात येताच त्याने तत्काळ दोघींना बाहेर काढले. त्याने आरोळ्या मारल्याने ग्रामस्थ धावून आले व दोघींनाही सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, सुंदरबाईचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले असून, ती गर्भवती होती. या प्रकरणी समाधान होलार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com