esakal | आयुध निर्माणीत केंद्र खासगीकरण विरोधात कामगारांची ‘वज्रमूठ’

बोलून बातमी शोधा

आयुध निर्माणीत केंद्र खासगीकरण विरोधात कामगारांची ‘वज्रमूठ’ }

सरकारद्वारे पुन्हा आयुध निर्माणींचे निगमीकरण प्रस्ताव पारित करण्यासाठी प्रयत्न चालवला जात आहे.

आयुध निर्माणीत केंद्र खासगीकरण विरोधात कामगारांची ‘वज्रमूठ’
sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : देशातील ४१ आयुध निर्माणीचा खासगीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकार पारित करू पाहत आहे. त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता असून, आयुध निर्माणी कामगारांतर्फे सरकारच्या धोरणाचा विरोध करीत शेवटच्या श्वासापर्यंत सरकारसोबत संघर्ष करण्याची शपथ घेतली. 


देशाच्या संरक्षणासाठी लागणारे विविध शस्त्र, दारूगोळा, शस्त्र-अस्र निर्माण करण्याचे कार्य देशातील ४१ आयुध निर्माणीत केले जाते. सरकार अशा आयुध निर्माणींचे निगमीकरण प्रस्तावानंतर कामगार संघटनांनी पुकारलेल्या अनिश्चित कालिन संपावर तोडगा काढत सेंट्रल लेबर कमिशनर, नवी दिल्ली यांच्यासमोर सरकार व फेडरेशनमधील वाटाघाटी सुरू आहेत. यात वार्षिक ३० हजार कोट्यवधींचे लक्ष साधण्यासाठी प्रस्ताव व प्रयत्न करीत असताना सरकारद्वारे पुन्हा आयुध निर्माणींचे निगमीकरण प्रस्ताव पारित करण्यासाठी प्रयत्न चालवला जात आहे. त्याचा विरोध म्हणून व देशाची राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेत संविधानाच्या कलमांचा अवमान सरकार करीत आहे. त्यामुळे एआयडीईएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएसच्या राष्ट्रीय संयुक्त समितीच्या आदेशानुसार मंगळवारी देशव्यापी शपथ आयुध निर्माणी कर्मचा-यांद्वारे घेण्यात आली. यात सर्व कामगारांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करण्याची शपथ घेतली. 


लिखित स्वरूपात पाठविली शपथ 
आयुध निर्माणी भुसावळ कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शपथ ग्रहण कार्यक्रमात सहभाग नोंदवला. सर्व कर्मचारी लिखित स्वरूपात शपथ संरक्षण मंत्रालय व एम्पॉवर ग्रुप ऑफ मिनिस्टरला पाठवित आहेत. आयुध निर्माणी भुसावळच्या सर्व संघटनांच्या संयुक्त संघर्ष समिती पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करीत आहे, अशी माहिती संयुक्त संघर्ष समितीचे संयोजक दिनेश राजगिरे यांनी दिली. 

संपादन- भूषण श्रीखंडे