Jalgaon KBCNMU News : मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त उद्यापासून विद्यापीठात कार्यक्रम

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त सोमवार (ता. १५) ते २८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra Universityesakal

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त सोमवार (ता. १५) ते २८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. ( Program in Bahinabai Chaudhary University on the occasion of Marathi Language Fortnight jalgaon news)

सोमवार (ता.१५) वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील यांच्या हस्ते भित्तीपत्रिकेचे प्रकाशन होईल , मंगळवार (ता.१६) मराठी विद्यापीठाची आवश्यकता याविषयावर गट चर्चा होईल. त्यात डॉ. संतोष खिराडे, डॉ. उमेश गोगडीया, डॉ. अतुल बारेकर सहभागी होतील.

बुधवार (ता.१७ ) कवी भगवान भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलन होईल. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे अध्यक्षस्थानी राहतील. प्राचार्य बी.एन. चौधरी, डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्रभाकर महाजन, गो.शी. म्हसकर, वि.रा. राठोड, पुष्पा साळवे, संध्या महाजन हे कवी सहभागी होतील.

गुरूवारी (ता.१८) समाजमाध्यमे आणि मराठी भाषा या समुहचर्चेत अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. आशुतोष पाटील, प्रा. मुक्ता महाजन, प्रा. मधुलिका सोनवणे, डॉ. मनीषा इंदाणी, प्रा. पवित्रा पाटील, डॉ. किर्ती कमळजा, डॉ. संतोष खिराडे, प्रवीण चंदनकर, डॉ. उमेश गोगडीया, डॉ. मनोज पाटील, डॉ. नितीन बडगुजर, डॉ. म.सु. पगारे सहभागी होणार आहेत.

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
KBCNMU News : संशोधन, नवोपक्रम गटात प्रा. माहेश्‍वरींचा समावेश; नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग

शनिवारी २० जानेवारीला महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित सत्यशोधक हा मराठी चित्रपट दाखविण्यात येईल.. २२ जानेवारीला विद्यार्थ्यांचे कवी संमेलन.

२३ जानेवारीला कथाकार ॲङ विलास मोरे यांचे कथाकथन, २४ जानेवारीला प्राचार्य डॉ. एस.आर.पाटील, जयसिंग वाघ, डॉ. वासुदेव वले, सतीष जैन, प्रकाश कांबळे, डॉ. रमेश माने यांच्या साहित्यिक गप्पा होणार असून कुलसचिव डॉ. विनोद पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अशी माहिती मराठी विभाग प्रमुख डॉ. म.सु. पगारे यांनी दिली.

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
KBCNMU News: ‘उमवि’चा 30 दिवसांच्या आत निकालाचा ‘पॅटर्न’; कॉपी प्रकरणे निम्म्यावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com