Jalgaon News : शासकीय योजनांचा शाहिरी पोवाड्यातून प्रचार

Shahir Powada
Shahir Powadaesakal

पाचोरा : माहिती व जनसंपर्क संचालनालय, जळगाव जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार शाहिरी पोवाडयांच्या माध्यमातून केला जात असून, या अभियानास पाचोऱ्यातून प्रारंभ झाला.

प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या उपस्थितीत नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील शाहीर शिवाजीराव व सहकाऱ्यांनी महाराष्ट्र गीतासह शासकीय योजनांवर आधारित पोवाड्यांचे गायन करून या अभियानाचा शुभारंभ केला. याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने शाहीर शिवाजीराव व सहकारी कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

Shahir Powada
Jalgaon News : ‘एसपी’ निवासस्थानालगत RTO एजंटची जत्रा; वाहतुकीचा खोळंबा अन्‌ पोलिस उदासीन

नगरदेवळा येथील खानदेश लोकरंग फाउंडेशनच्यावतीने शाहिरी पोवाड्यातून शासकीय योजनांचा प्रचार प्रसार अभियान सुरू करण्यात आला आहे. शाहीर शिवाजीराव व सहकाऱ्यांनी शाहीर पोवाड्यांच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, तृणधान्य, ज्येष्ठ नागरिक सवलती, जिल्हा वार्षिक योजना व नियोजन, सर्वसामान्यांसाठीच्या योजना यांच्या प्रचार व प्रसारासाठी लक्षवेधी व कर्णमधूर शाहिरी पोवाड्यांची रचना केली असून, महाराष्ट्र गीतासह हे पोवाडे तालुकाभरात सादर करून शासकीय योजनांसंदर्भात नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे.

Shahir Powada
Jalgaon News : शिवाजीनगर पुलाच्या समांतर रस्ता कामाबाबत मक्तेदार बेदखल; स्मरणपत्रांना केराची टोपली

शाहीर नामदेव पाटील, जितेंद्र भांडारकर, बाबुराव मोरे, गोकुळ पाटील, भूषण पवार, मिलिंद शेडगे, रामसिंग राजपूत, सुरज राऊळ, कविता पाटील या सहकाऱ्यांसह शाहीर शिवाजीराव पाटील हे पाचोरा, बाळद, गाळण, नगरदेवळा, तारखेडा, निपाणे, आखतवाडे, बदरखे, लोहटार, अंतुर्ली, सार्वे, खाजोळा, पिंपळगाव आदी गावात या योजनांचा प्रचार व प्रसार करत आहेत. या अभियानास नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Shahir Powada
Jal Jeevan Work : अजबच! जलजीवनच्या कामांमध्ये गावकऱ्यांचे असहकार्य; कानळद ग्रामपंचायतीतील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com