Khandesh Expressway : 9 हजार कोटींचा 'खानदेश एक्स्प्रेस वे' ठरणार विकासाचा राजमार्ग, 'समृद्धी'शी कनेक्ट; मुंबई, पुण्यासह नागपूरला 6 तासांत पोहोचता येणार
What is the Proposed Khandesh Expressway? जळगाव ते समृद्धी महामार्ग जोडणारा प्रस्तावित सहापदरी खानदेश एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर मुंबई, पुणे आणि नागपूरचा प्रवास जलद होणार असून खानदेशच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
जळगाव : मुंबई, नागपूर आणि पुण्याला जळगावकरांना अवघ्या सहा-साडेसहा तासांत पोहोचता येईल, अशी दळवळणाची सुविधा उपलब्ध करून देणारा ‘खानदेश एक्स्प्रेस वे’ हा सहापदरी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.