Jalgaon Crime News : जुगार अड्ड्यावर छापा; 20 जण ताब्यात

Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : येथील बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलन परिसरातील जवाहर बँग शॉपच्या शेजारी असलेल्या सट्टा, जुगार अड्ड्यावर चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या पथकाने छापा टाकून २० जणांना ताब्यात घेत रोकड व सट्टा जुगारच्या साहित्यासह 1 लाख १५ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (raid on gambling den at Pachora 1 lakh worth of goods seized jalgaon crime news)

या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये धडकी भरली आहे. पाचोरा येथे गजबजलेल्या भाजी मंडी भागात राजरोसपणे सट्टा पिढी सुरू असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यांकडून सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांनी १३ ला दुपारी तीनच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला.

पेढीत सट्टा खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या अविनाश सूर्यवंशी, रवींद्र महाले, अनिल वाणी, सचिन जाधव, नाना पवार, विष्णू महाजन, शब्बीर बागवान, लक्ष्मीकांत वैद्य, हिरालाल सोनवणे, नाना पाटील, शोभराज कुमावत, जगदीश जाधव, एकनाथ पाटील, गोपाल लोहार, सुभाष भिल, कडूबा कुंभार, सुरेश पाटील, भिकन पाटील, दिनकर पाटील व सट्टा पेढीचे मालक संतोष पाटील यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Crime
Jalgaon Crime News : यावलला वृद्धाला चौघांकडून मारहाण

८३ हजार ६९० रुपयांची रोकड तसेच सट्टा जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख १५ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अभयसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महेश बागूल, राजेंद्र निकम, सुनील पाटील, पवन पाटील, अजय पाटील या पथकाने हा छापा टाकला. अजयसिंग राजपूत यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापुढे अवैध धंद्यांवर करडी नजर राहणार असून, अवैध धंदे चालकांनी धंदे बंद करावेत, असा इशारा श्री. देशमुख यांनी दिला आहे.

Crime
Jalgaon Crime News : अमळनेर येथील तरुणास चौघांकडून बेदम मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com