
जळगाव : गुजराल पंपाजवळील जुगार अड्ड्यावर छापा
जळगाव : शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरु असून पोलिसांनी त्याविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार गुजराल पेट्रोल पंपाजवळील पडक्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर केलेल्या कारवाईत ११ हजार ३० रूपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सट्टा खेळविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजराल पेट्रोल पंपाजवळील पडक्या जागेत हिरवे कापड लाऊन एक व्यक्ती सट्टा-जुगार खेळवित असल्याची पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांना मिळाली. त्यांच्या सुचनेनुसार पोलिस कर्मचारी विकास पहुरकर, फिरोज तडवी, सतीश करणकाळ यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास जुगार अड्डयावर धाड टाकली. याठिकाणी नितीन सोनवणे (रा. पिंप्राळा) हा सट्टा-जुगार खेळविताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत ११ हजार ३० रूपयांचे जुगार साहित्य जप्त केले. विकास पहुरकर यांच्या फिर्यादीवरून नितीन सोनवणेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा: पोर्टलवर जॉब शोधणे महागात; तरुणीला अडीच लाखाला गंडविले
हेही वाचा: आयशरमध्ये आढळले 3 टन मांस
Web Title: Raid On Gambling Den Near Gujral Pump Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..