
अवैधरीत्या गॅस भरणाऱ्या पंपावर छापा; मुद्देमाल जप्त
जळगाव : शहरातील बळीरामपेठेतील दुर्गादेवी चौकात घरगुती गॅसचा (Household LPG Gas) काळाबाजार करून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या (Illegally) घरगुती वापराचा गॅस भरून देणाऱ्यांवर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा (Raid) टाकून कारवाई केली आहे. कारवाईत ४ लाख १५ हजार २३० रुपयांचे साहित्य, गॅससिलेंडर जप्त (Seized) करण्यात आले आहे. (Raid on illegally filled gas pump gang of 12 people with 4 lakh worth items in their seized Jalgaon crime news)
बळीरामपेठेतील गंगूबाई शाळेसमोर दुर्गा देवी चौकात अनधिकृतपणे काही जण वाहनांमध्ये घरगुती गॅस भरून देत असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल फुला यांच्यासह राखीव पोलिस पथकाला कारवाईच्या सुचना केल्यानंतर. पोलिस पथकाने सायंकाळी घटनास्थळ गाठले. साध्या वेशात चारही बाजूने या अवैध गॅसपंपाला गराडा घालून छापा टाकला असता याठिकाणी दहा ते बारा जण घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षात तसेच चारचाकी वाहनांमध्ये गॅस भरताना आढळले. पोलिस पथकाने त्यांच्यावर कारवाई करून गॅस भरण्याचे मशिन, सिलिंडर तसेच इतर साहित्य असा एकूण ४ लाख १५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल फुला यांच्या फिर्यादीवरुन नाजिम खान नईम खान पठाण, फिरोज खान सलीम खान ऊर्फ फौजी, अब्दुल रज्जाक रंगरेज, शेख सोनू एजाज, प्रकाश वारुळे, दीपक घनशाम पाटील, गणेश काशिनाथ गोवे, महादू शंकर तेलंग, दिलीप ओंकार सोनवणे, सिकंदर शब्बीर शेख, विजय देवराम सोनवणे व जितेंद्र वसंत चौधरी अशा १२ संशयितांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय निकुंभ करीत आहेत.
हेही वाचा: Jalgaon : जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण
पोलिस ठाणे निद्रिस्त
शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावरच स्वयंपाक गॅसचा हा काळाधंदा सुरु होता. पोलिस ठाण्यातील काहींना चिरीमिरी देत बेकायदेशीररीत्या स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून पंपाच्या साहाय्याने वाहनात गॅस भरुन देण्याचा गोरख धंदा सुरु होता. परिसरातील लोकांनी अनेक वेळेस पोलिसांना कळवले मात्र, कारवाईच होत नसल्याने अखेर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना तक्रार केल्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. शहर पोलिस निद्रिस्त असतानाच या पथकाने टाकलेल्या छाप्याने एकच खळबळ माजली आहे.
हेही वाचा: Jalgaon Crime : दुरुस्तीला आलेल्या दुचाकींच्या सुटे भागांची विक्री
Web Title: Raid On Illegally Filled Gas Pump Gang Of 12 People With 4 Lakh Worth Items In Their Seized Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..