Jalgaon : जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण

beating
beatingesakal
Updated on

जळगाव : कुसुंबा बसस्थानकाजवळ जुन्या भांडणाच्या (Old Quarrel) कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून बिअरच्या बाटली मारुन (Beating) जखमी केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Beating due to old quarrel jalgaon Crime)

beating
Nashik : गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामास वेग

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे हर्षल राजेंद्र सोनवणे (वय २२) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. २) दुपारी १ वाजेच्या सुमारास कुसुंबा येथील बसस्थानकाजवळ उभा असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील तुषार कोळी, अमित तडवी, करण व सोन्या (पूर्ण नाव माहित नाही) आणि त्यांच्या सोबत इतर जणांनी हर्षलला अडवून शिवीगाळ केली. प्लास्टिक पाईप, काठी आणि बिअरच्या बाटलीने बेदम मारहाण करून डोक्यावर व चेहऱ्यावर मोठी दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता हर्षल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात तुषार कोळी, अमित तडवी, करण व सोन्या (पूर्ण नाव माहित नाही) आणि त्यांच्या सोबत इतर जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

beating
काट्या मारुती चौकात वाहतूक कोंडी नित्याची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Yogesh Nemade
Marathi News Esakal
www.esakal.com