Jalgaon : शहरात वाहतूक सिग्नल बंद वाहतुकीची कोंडी

Traffic jam
Traffic jamesakal

जळगाव : शहरात वाहतूक यंत्रणा सुव्यवस्थित राहावी यासाठी मुख्य चौकाचौकांत सिग्नल लावण्यात आले आहेत.परंतु अनेक दिवसांपासून नव्हे तर महिन्यांपासून शहरातील अर्धेअधिक वाहतूक सिग्नल नादुरुस्त असल्याने बंद अवस्थेत आहेत. याचा परिणाम ऐन गर्दीच्या वेळीच नव्हे तर अन्य वेळी वाहतुकीची कोंडी होत आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच वाट काढावी लागत आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणेसह लावण्यात आलेले पोलिस पॉइंटही अडगळीत पडले आहेत. वाहनचालक कशीही वाहने चालवीत असल्याचे चित्र आहे. सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे वाहतूक पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.(Traffic jam in city with traffic signal off Jalgaon News)

Traffic jam
Crime Update : दीड लाखांची लाच मंडळ अधिकारी सह तलाठी जाळ्यात

मुख्य रस्त्यांवर गर्दी

शहरात प्रवेश करणाऱ्या चौकांत तसेच मुख्य रस्त्यांवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून चौकाचौकांत सिग्नल लावण्यात आले. वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस प्रशासनातर्फे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे तसेच अतिपावसामुळे सिग्नल यंत्रणा नादुरुस्त असल्याने बंद आहे. यात यात वर्दळीच्या चौकांतील सिग्नलचा समावेश आहे. यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडू लागले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. अशातच सिग्नल बंद असल्याने अपघाताचा धोका वाढला असून, वाहतूक अनियंत्रित होत असल्याचे चित्र आहे. ही समस्या सोडविण्याकडे महापालिका प्रशासन व स्थानिक वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष झाले आहे.

नवनवीन वाहनांची रस्त्यांवर रेलचेल

विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहनांच्या संख्येत भर पडली आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे. उत्सवांदरम्यान विविध वाहन कंपन्यांकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स असल्यामुळे शहरात दररोज नवीन वाहनांची भर पडू लागली आहे. शिवाय शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सिग्नलची आवश्यकता आहे.

शाळा-महाविद्यालयांजवळ गर्दी

सकाळी नऊ ते दहादरम्यान अनेक प्रशासकीय कार्यालयांत जाण्यासाठी वाहनधारक कर्मचाऱ्यांची गर्दी असते. नवीन बसस्थानक परिसरात रिक्षा स्टॉपव्यतिरिक्त अन्य ठिकाणी प्रवासी उतरविण्यासाठी वा घेण्यासाठी रस्त्याच्या मध्येच रिक्षा उभी केली जाते. मागाहून येणारी रिक्षा ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसोबत वादविवादाचे प्रसंग उद्‍भवले आहेत. शिवाय स्टेडियम चौकात अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा व सायंकाळी पाच ते सहा या शाळा सुटण्याच्या वेळेस रिक्षाचालकांकडून रस्त्यातच रिक्षा उभ्या केल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Traffic jam
Jalgaon Road Accident : जळगावातून जातात मृत्यूचे महामार्ग

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांची गर्दी

बसस्थानक, पोलिस मुख्यालयासमोरील रस्त्यावरील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे अनेक दुचाकी तसेच तीनचाकी वाहनचालक रस्ते दुभाजक संपल्यानंतर वळण रस्त्याचा वापर न करता शॉर्टकट मार्ग म्हणून सरळ विरुद्ध दिशेने वाहने जोरात चालवीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पादचारी आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

अपुरे पोलिसबळ

दिवसेंदिवस विस्तारित होत असलेल्या शहरात रोज नव्या वाहनांची भर पडतच आहे. शहरात सुमारे २० ते २५ सिग्नल चौक आहेत.

शिवाय घाणेकर चौक सुभाष चौक वा अन्य गर्दीच्या ठिकाणी आवश्यकता असूनही पॉइंट लावणे शक्य होत नाही. वाहनांची संख्या अधिक व वाहतूक पोलिस कमी असे चित्र शहरात आहे.

Traffic jam
अमृत टप्पा क्रमांक 2.0 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण DPR तयार करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com