रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे केळीचे जबर नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain damage banana farm

रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे केळीचे जबर नुकसान

रावेर (जि. जळगाव) : तालुक्यात मे अखेर व जूनच्या पंधरवाड्यात झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे सुमारे ५६ गावांमधील अकराशे हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. ज्यात सुमारे ५९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली असून हा अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविण्यात आला आहे.

रावेर तालुक्यात ३१ मे तसेच ८ व ११ जूनला वादळी पाऊस झाला होता. वादळाचा जोर काही वेळ जास्त असल्याने वादळाच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे केळी पीक अक्षरशः जमिनदोस्त झाले होते. महसूल व कृषी विभागातर्फे सुरवातीला ३१ मे रोजी पंचनामे करण्यात आले. त्यानंतर ८ व ११ जूनला झालेल्या नुकसानीचे पंचनामे आज पूर्ण झाले. तीन दिवसांत झालेल्या वादळी तडाख्यामुळे ५६ गावांमधील तब्बल २ हजार ३८३ शेतकऱ्यांच्या १ हजार १७७.१४ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे सुमारे ५९ कोटी २७ लाख ३२ हजार ६६८ रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या केळीला विक्रमी भाव मिळत आहे. अशातच वादळी पावसाच्या तडाख्यामुळे केळी पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: वरुणराजाच्या हजेरीनंतरही 3 तालुक्यात कमी पाऊस

रावेर तालुक्यात झालेल्या नुकसानाची आकडेवारी

तारीख गावे शेतकरी बाधित क्षेत्र (हेक्टर) एकूण नुकसान

३१ मे ...... १५ गावे ...... ६०८ ......... ३०८.२३ ............. १३ कोटी ७३ लाख ५२ हजार

८ जून ...... २५ गावे ...... १,३८६ ...... ७९९.९१ ............. ३१ कोटी ९९ लाख ६४ हजार

११ जून ..... १६ गावे ...... ४०७ ......... ३३९ .................. १३ कोटी ५४ लाख १६ हजार

हेही वाचा: पारोळा तालुक्यात जोरदार पाऊस! अंजनी नदीला पूर, शेतकऱ्यांमध्ये समाधान

Web Title: Rain Damage Banana Farm Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..