Ram Navami 2023 : घरोघरी आज होणार श्रीराम जन्मोत्सव; शोभायात्रेचे आकर्षण!

ram navami
ram navami esakal

जळगाव : संपूर्ण भारतभर श्रीराम नवमी (Ram Navami 2023) मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या उत्सवानिमित्त गुरुवारी (ता. ३०) घरोघरी राम नवमीचे चैतन्य असेल. (ram navami 2023 Shri Ram Navami will be celebrated with great enthusiasm jalgaon news)

कोरोना शासकीय निर्बंध असल्यामुळे गेली तीन वर्षे झाले राम नवमी अगदी साध्या पद्धतीने साजरी झाली.

विहिंपचे आवाहन

या वर्षी कोणतेही निर्बंध नाहीत व अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे मंदिर निर्माण कार्य पूर्णत्वाकडे असल्यामुळे मोठ्या उत्साहाने हा सोहळा पार पडणार आहे. विश्‍व हिंदू परिषदेने जिल्ह्यात केलेल्या नियोजनानुसार सर्व प्रखंडांत श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ram navami
Ram Navami 2023 : प्रभू श्रीरामांनी अयोध्या ते लंका कसा केला प्रवास? आजही पहायला मिळतात ती ठिकाणे!

सामूहिक प्रतिमापूजन, श्रीराम मंदिरात जन्म सोहळा, सामूहिक आरती, असे कार्यक्रम होतील. नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच घरावर भगवा ध्वज लावावा, सायंकाळी अंगणात सडा- रांगोळी टाकावी व अंगणात तेलाचे ९ दिवे लावावेत, असे आवाहन विहिंपने केले आहे.

रामरक्षा स्तोत्र पठण

रामनवमीनिमित्त रिंग रोडवरील शिक्षक वाडीतील वर्धमान स्कूलशेजारील ऑर्ट ऑफ लिव्हिंग भवनात गुरुवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत रामरक्षा स्तोत्रपठण, राम ध्यान भजनाचा व सत्संग होणार आहे. सर्व भाविक व श्रीराम भक्तांनी सहभागी व्हावे, असे आयोजक रेखा टोके यांनी कळविले आहे.

ram navami
Ram Navami 2023 : प्रभू रामचंद्रांनी स्थापलेल्या शिवलिंगाने पावन श्रीक्षेत्र रामेश्‍वर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com