Latest Marathi News | अश्लिल Vedio Callच्या बळावर उकळली खंडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime News

Cyber Crime News : अश्लिल Vedio Callच्या बळावर उकळली खंडणी

जळगाव : तरुणाला आलेल्या व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्या नकळत अश्लिल व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग पलीकडून बोलणाऱ्या महिलेने केली. या व्हिडीओ कॉलची केलेली रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख ३९ हजार ७४० रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खडका (ता. भुसावळ) येथील ३२ वर्षीय तरुणाला २१ व २२ नोव्हेंबरदरम्यान अनोळखी महिला युजर्सकडून व्हॉट्‌सअ‍ॅप कॉल आला. व्हिडीओ कॉलद्वारे अश्लाख्य चित्रण करून ते रेकॉडिंग व्हायरल करण्याची धमकी देत पीडित तरुणाला खंडणीची मागणी केली. (Ransom extortion on the strength of obscene Video Call Jalgaon Cyber Crime News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jalgaon Crime News : उड्डाणपुलावर रोकडसह दोन मोबाईल हिसकावले

वेळोवेळी पीडित तरुणाकडून एक लाख ३९ हजार ७४० रुपयांची खंडणी ऑनलाईन उकळली. याबाबत घनश्याम अरुण महाजन यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

युट्यूब-क्राईम ब्रांचच्या नावे फोन

आम्ही युट्यूबमधील अधिकारी बोलतोय, क्राईम ब्रांचमधून बोलतोय, अशी बतावणी करून भीती घालून या तरुणाला धमकावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले असून, अगोदर ही मंडळी व्हॉटस्‌ॲपवरून साध्या पद्धतीने फ्रेंडशीप चॅट करतात. त्यानंतर अश्लाख्य व्हिडीओ अपलोड करण्याचे धमकावून खंडणी उकळली जात असल्याने तरुणांनी अशा भामट्यांना न घाबरता पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन साबर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: Jalgaon News : तळमजला Parking नसलेल्या इमारतींना अभय; महापालिका कारवाई करण्यास असमर्थ