Jalgaon Rathotsav : ‘श्री बालाजी’च्या जयघोषाने दुमदुमले धरणगाव; शेकडो वर्षांची परंपरा

Devotees participating in the Rath Yatra of Shri Lord Balaji.
Devotees participating in the Rath Yatra of Shri Lord Balaji.esakal
Updated on

Balaji Rathotsav : येथे शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला रथोत्सव मंगळवारी (ता. २५) मोठ्या जल्लोषात काढण्यात आला. सायंकाळी चारला श्री बालाजी महाराजांची यथासांग पूजा संस्थानचे पुजारी श्री. गणेश व उज्ज्वला पुराणिक, कालिदास पुराणिक व कुटुंबीय यांच्या हस्ते झाली. (Rathotsav was conducted on Tuesday in dharangaon jalgaon news)

त्यानंतर महापूजेसाठी श्री नारायण भक्त पंथाचे मुख्य प्रवर्तक लोकशानंद महाराज, इंदूर येथील उद्योजक आलोक गुप्ता, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, धरणगाव अर्बन बँकेचे चेअरमन प्रवीण कुडे, अॅड. ओम त्रिवेदी, सुनील बडगुजर, प्रांताधिकारी श्री गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पालिका प्रशासक व मुख्याधिकारी जनार्दन पवार प्रशासकीय अधिकारी श्री. पारधी, पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले, कल्याणचे जगन्नाथ पोलाद महाजन, मंडळाचे अध्यक्ष दिलीप रामू पाटील, बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. आर. पाटील, संचालक मंडळ यांच्या हस्ते पूजन, आरती होऊन रथोत्सवाला प्रारंभ झाला.

या वेळी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील, सेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जीवनसिंह बायस, वसंतराव भोलाने, नगरसेवक ललित येवले, संजय महाजन, कैलास माळी, मंडळाचे सचिव किरण वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Devotees participating in the Rath Yatra of Shri Lord Balaji.
Khandesh Rathotsav : पारोळा, धरणगाव, चोपड्यात आज रथोत्सव; खानदेशातील अनेक वर्षांची थोर परंपरा

बालाजी मंदिरापासून धरणी चौक, कोट बाजार अशी रथाची मिरवणूक काढण्यात आली. साने पटांगणावर या मिरवणुकीत सर्वधर्मीय भाविक सहभागी झाले. ग्रामीण भागातून बैलगाडी, ट्रॅक्टर, रिक्षा अशा वाहनांनी भाविक शहरात दाखल झाले होते. साने पटांगणावर गृहोपयोगी वस्तू ,मिठाईची दुकाने थाटली होती. यातून फार मोठी आर्थिक उलाढाल झाली.

रथाला मान देण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील अनेक लेझिम पथक उपस्थित होते. यातील उत्कृष्ट लेझिम पथकाला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. या मिरवणुकीवर बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. आर. पाटील, त्यांचे व्यवस्थापक मंडळ, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी लक्ष ठेवून असतात. शहरातील बालकवी व सारजाई कुडे विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे लेझीम आणि झांज पथक मिरवणुकीतले खास आकर्षण होते. पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Devotees participating in the Rath Yatra of Shri Lord Balaji.
Kojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमा उत्सवासाठी कावडधारकांची सप्तशृंगगडाकडे कूच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com