जिल्ह्यातील ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामसभेत मतदार याद्यांच्या वाचनावेळी गर्दी

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीत मंगळवारी (ता. १६) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत ‘विशेष ग्रामसभा’ झाल्या. ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन झाले. ग्रामसभांमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी दुबार नावे काढावीत, मतदार याद्यांतील त्रुटी काढाव्यात अशा सूचना मांडल्या.

मतदारांच्या सूचना लिहून घेण्यात आल्या आहेत. आता त्याप्रमाणे ‘बीएलओ’ त्या दुरुस्त्या करतील. नंतर मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया होईल.

हेही वाचा: 'डीपकाडी जनाई-श्रीरंगी' या फुलवनस्पतीचा शोध

निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवले यांनी सांगितले, की निवडणूक आयोगाच्या वतीने दरवर्षी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सध्या हा कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याचे तपासून घ्यावे. मतदार यादीत नाव नसल्यास, १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. नवविवाहित महिलांचा नावात बदल, दुबार नावे व मयत असल्यास नाव वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, जेणेकरून मतदार यादी निर्दोष व अद्ययावत तयार होईल. राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद, विधानसभा बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदार यादीत नाव नोंद झाल्याची खात्री करावी.

loading image
go to top