Jalgaon News : रेल्वे पेन्शन अदालतीत 12 तक्रारींचे निवारण; ‘पीपीओ’चे पुनर्मूल्यांकन

pension
pensionesakal

Jalgaon News : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

येथील रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात झालेल्या या पेन्शन अदालतीत १३८ तक्रारी दाखल होत्या. यापैकी १२ तक्रारींचे सोडविण्यात आल्या.(Redressal of 12 grievances in Railway Pension Court jalgaon news)

सुनावणीअंती संबंधितांच्या बँक खात्यात १२ लाख ८८ हजार ४७ रूपये वर्ग करण्यात आले. या पेन्शन अदालतीत न्यायाधीश डीआरएम इति पांडे यांनी काम पाहिले. रेल्वेतोल निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारणासाठी वर्षातून दोनवेळा पेन्शन अदालत घेतली जाते.

त्यासाठी तीन महिने आधीच सूचना देऊन निवृत्त कर्मचाऱ्यांकडून तक्रारी, समस्या मागविण्यात येतात. २०२३ च्या द्वितीय पेन्शन अदालतीत एकूण १३८ तक्रारी प्राप्त झाल्या. पैकी १२ तक्रारी वेतनासबंधित होत्या. त्या सोडविण्यात आल्या. तसेच ३७ पीपीओचे व परिवार पेन्शनचे म्हणून पुनर्मूल्यांकन करण्यात आले.

pension
Jalgaon News : प्रिंप्राळा उड्डाणपुलामुळे होणार वेळेची बचत : गुलाबराव पाटील

मुख्य न्यायाधीश डीआरएम इति पांडे होत्या. डीआरएम (शासन) सुनीलकुमार सुमन, लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन. एस. काजी यांनी प्रास्ताविक केले.

सहाय्यक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक कार्मिक अधिकारी अतुल रायकवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी तडजोड आणि लेखा विभागाने सहकार्य केले. पुढील वर्षातील लोकअदालती आयोजनावर लवकरच निर्णय होईल.

pension
Jalgaon News : पुणे- मुजफ्फरपूरदरम्यान विशेष गाडी धावणार; 21 डिसेंबरपासून सुरू होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com