Jalgaon News : पुणे- मुजफ्फरपूरदरम्यान विशेष गाडी धावणार; 21 डिसेंबरपासून सुरू होणार

 train ( file photo )
train ( file photo )esakal

Jalgaon News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुणे - मुजफ्फरपूरदरम्यान विशेष गाड़ी चालविण्यात येईल.(special train will start between Pune Muzaffarpur Jalgaon News )

०५२८६ पुणे - मुजफ्फरपूर सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस- २१ डिसेंबरला आणि २८ डिसेंबरला पुणे येथून रात्री ११ वाजता सुटून शनिवारी ६ वाजता मुजफ्फरपूर येथे पोहचेल.

०५२८५ मुजफ्फरपूर-पुणे सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस- २० डिसेंबरला आणि २७ डिसेंबरला मुजफ्फरपूर येथून दुपारी १ वाजता सुटून गुरुवारी रात्री ९ वा. पुणे येथे पोहचेल.

 train ( file photo )
Jalgaon News : गिरणेवर पूल, 158 किमीचे शेतरस्ते मंजूर : आमदार किशोर पाटील

दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर याठिकाणी थांबा असेल.

गाडीत एसी फर्स्ट -१, एसी टू- २, एसी थ्री-११, एसी थ्री इकॉनॉमी-४, जनरेटर कार - २ आरक्षण डबे असतील. गाड़ी क्रमांक ०५२८६ पुणे - मुज्जफ्फरपूर सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसचे बुकिंग १८ डिसेंबरपासून सर्व आरक्षण केंद्र आणि वेबसाइट irctc.co.in वर सुरू होईल.

 train ( file photo )
Jalgaon News : प्रिंप्राळा उड्डाणपुलामुळे होणार वेळेची बचत : गुलाबराव पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com