
जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनवरील वीज पुरवठ्यात बिघाड झाला होता. अद्यापही तो दुरुस्त झालेला नाही, परंतु वीज वितरण कंपनीने तात्पुरती जोडणी केली आहे. त्यामुळे शहरात रविवार(ता.१८)पासून नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. (Regular water supply from today Latest Jalgaon News)
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनवरील विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली होती. या वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड काढण्याचे काम सुरू आहे, त्याची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही.
परंतु शहरातील पाणीटंचाई लक्षात घेत वीज वितरण कंपनीने तात्पुरती वीज जोडणी दुसऱ्या भागातून करून दिली आहे. मात्र त्यांचे दुरुस्तीचे काम सुरूच राहणार आहे. याबाबत पाणीपुरवठा अभियंता संजय नेमाडे यांनी सांगितले, की वीज वितरण कंपनीने तात्पुरती वीज जोडणी केल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्यात आला आहे.
रविवारी पिंप्राळा गावठाण, खंडेरावनगर, नित्यानंद टाकी परिसर, मेहरूणमधील भाग, अयोध्यानगर भागात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, सोमवारी (ता. १९) नटराज टाकी, चौघुले मळा, शनीपेठ, बळीराम पेठ, आकाशवाणी जवळील संपूर्ण भाग, डीएसपी चौकजवळील भाग, नित्यानंद. मंगळवारी (ता. २०) वाल्मीकनगर, दिनकरनगर, मोहननगर, नेहरूनगर, गेंदालाल मिल जवळील भाग, शिवाजीनगर, हुडको, प्रजापतनगर, शिवकॉलनी आदी परिसर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.