जळगाव : महसूल वसुलीत दहा तालुके रेड झोनमध्ये

यावल, धरणगाव ‘ग्रीन’, तर भुसावळ, जामनेर, एरंडोल ‘येलो’: जिल्ह्याची महसूल वसुली केवळ ४६ टक्केच

Revenue collection Ten talukas in red zone Yawal Dharangaon Green zone  Bhusawal Jamner Erandol Yellow
Revenue collection Ten talukas in red zone Yawal Dharangaon Green zone Bhusawal Jamner Erandol Yellowsakal

जळगाव : जिल्ह्यात महसूल वसुलीचे उद्दिष्ट १७७ कोटी ८४ लाख एवढे असताना आतापर्यंत ८३ कोटी ४२ लाख ३८ हजार अर्थात ४६.९१ टक्के वसुली झाली आहे. ९४ कोटी ४१ लाख ६२ हजारांची वसुली बाकी आहे. महसूल वसुली करण्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी धावपळ होण्याची चिन्हे आहेत.


Revenue collection Ten talukas in red zone Yawal Dharangaon Green zone  Bhusawal Jamner Erandol Yellow
ऑनलाइन-ऑफलाइनमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा

गतवषी कोरोनाचे कारण दाखवित महसूल वसुली झालेली नव्हती. मात्र ऐनवेळी वाळू लिलाव झाल्याने वसुलीचे टारगेट पूर्ण झाले. यंदा कोरोनाची तिसरी लाट असताना रुग्णसंख्या कमी होती. तरीही महसूल वसुलीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भर नव्हता. आता नुकत्याच झालेल्या महसूल वसुलीच्या बैठकीत वसुलीचे टारगेट पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.


Revenue collection Ten talukas in red zone Yawal Dharangaon Green zone  Bhusawal Jamner Erandol Yellow
ऑनलाइन-ऑफलाइनमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा

आतापर्यंत झालेल्या महसूल वसुलीनुसार यावल व धरणगाव तालुक्याने अनुक्रमे ६४ व ७२ टक्के वसुली करून ग्रीन झोन मिळविला आहे. तर भुसावळ, जामनेर, एरंडोल या तालुक्यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मात्र ६० टक्क्यांपेक्षा कमी वसुली केल्याने ते येलो झोनमध्ये आहेत. तर तब्बल दहा तालुके रेड झोनमध्ये आहेत. त्यांनी २८ ते ४९ टक्केच वसुली केली आहे. रेडझोनच्या तालुक्यात बोदवड, मुक्ताईनगर, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, अमळनेर, रावेर, पाचोरा, पारोळा या तालुक्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com