Latest Marathi News | महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या सप्टेंबरमध्ये? राज्यातील सत्तांतराचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Revenue Officer Transfers

महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या सप्टेंबरमध्ये? राज्यातील सत्तांतराचा फटका

जळगाव : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी मे अखेरीस होतात. यंदाही त्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने जून अखेरपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली. मात्र, आता तर राज्यात सत्तांतरच झाले आहे. यामुळे बदल्यांना मुहूर्त नवीन पालकमंत्री जाहीर झाल्यानंतरच होईल. सप्टेंबर महिन्यात बदल्या होण्याचे संकेत आहेत. (Latest Marathi News)

हेही वाचा: चीनच्या BRI ला INSTC उत्तर; भारत-रशियाच्या दळणवळणाचा वेळ झाला कमी

गतवर्षी कोरोनामुळे संभाव्य महसूल बदल्यांना स्थगिती दिली होती. नंतर मात्र सप्टेंबरमध्ये बदल्या झाल्या होत्या. आता जिल्ह्यातील तब्बल २० अधिकारी बदलीस पात्र आहेत. अनेकांनी बदल्यांसाठी मार्च महिन्यापासूनच फिल्डींग लावली आहे. ते बदल्यांसाठी ताटकळत आहेत. त्यांना पाल्यांना संबंधित बदलीच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे. बदल्यांसाठी त्यांनी संबंधित ठिकाणच्या तत्कालीन पालकमंत्री, मंत्रालयात फिल्डींग लावली होती. मात्र, आता राज्यात सत्तांतरच झाल्याने लावलेली फिल्डींग वाया जाण्याची शक्यता आहे. कारण बदल्यापूर्वीचे पालकमंत्री व सत्तांतरानंतरचे पालकमंत्री वेगळे असण्याची शक्यता आहे. यामुळे फिल्डींग लावणारे गोंधळात पडले आहेत. तेही नवीन मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत आहेत. केव्हा एकदाचा मंत्रिमंडळ विस्तार होतो अन्‌ बदल्यांची प्रक्रिया सुरू होते, असे त्यांना झाले आहे.

हेही वाचा: NSEच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना EDकडून अटक

बदल्या कोणाच्या?

जळगाव जिल्ह्यात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्या आहे अन्‌ ज्यांनी हा कालावधी पूर्ण होऊन विनंती बदल्यासाठी अर्ज केला आहे. किंवा ज्यांनी पती-पत्नी एकत्रीकरण योजनेनुसार अर्ज केला आहे किंवा प्रशासकीय कारणावरून बदल्या होणार आहेत. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बदल्या झाल्या होत्या. आताही तेव्हाच बदल्या होतील, असे सांगितले जात आहे.

पाल्यांचा शैक्षणिक प्रश्‍न नाहीच

मे महिन्यात बदल्या झाल्या, तर जून महिन्यात पाल्यांना शाळेत, महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सत्रापासून जाणे सुकर होते. यामुळे मे अखेरीस बदल्यांची प्रक्रिया होते. मात्र, अधिकारी कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्यात गेला, तरी बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी पाच टक्के जागा सर्वच शैक्षणिक संस्था राखीव ठेवतात. यामुळे बदली केव्हाही झाली, तरी अधिकाऱ्यांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.

हेही वाचा: भारतीय टेक कंपन्यांकडून तब्बल 2 लाखाहून अधिक अमेरिकन लोकांना रोजगार

Web Title: Revenue Officers Waiting For Transfers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..