
Police Detain Three in Robbery Case at Minister Raksha Khadse Petrol Pump
Esakal
जळगावमध्ये मुक्ताईनगर इथं महामार्ग क्रमांक सहावर पेट्रोल पंप, दुकानांवर दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आलीय. यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरही दरोडा टाकण्यात आलाय. यात लाखो रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे साहित्य लुटून नेल्याची प्राथमिक माहिती समजते. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय.