
Jalgaon Crime News : RTO एजंटची दुचाकी लंपास
जळगाव : शहरातील हॉटेल पारसजवळील वखारीशेजारून आरटीओ एजंटची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. (RTO agents bike stolen Jalgaon Crime News)
हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
हेही वाचा: Nashik Crime News : मालेगावला शालेय फीची रक्कम चोरणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
किरण युवराज कोळी (वय ३९) परिवारासह एकनाथनगरमध्ये कॉलनीत वास्तव्याला असून, आरटीओ कार्यालयात एजंट आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १०, डीजी ३८६९) घेऊन ते रविवारी (ता. १) सायंकाळी सहाला कामानिमित्त हॉटेल पारसनजीकच्या पन्नालाख वखार येथे आले होते.
वखारीजवळ त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली. एक तासानंतर काम आटोपून परतल्यावर त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक विकास सातदिवे तपास करीत आहेत.
हेही वाचा: Nashi Crime News : गावठी दारू विक्री करणाऱ्यास अटक