Latest Jalgaon News | मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेने ग्रामीण भागात संभ्रम; पोलीसांचा कारवाईचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेने ग्रामीण भागात संभ्रम; पोलीसांचा कारवाईचा इशारा

मेहुणबारे (जि. जळगाव) : गेल्या काही दिवसापासून मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली आहे. ग्रामीण भागात अशा अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवून त्याला खतपाणी घातले जात असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर मेहूणबारे पोलीसांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.अशा अफवा पसरवल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. (Rumors of gangs abducting children fake news in rural areas Police action warning Latest crime Jalgaon News)

गावात मुले चोरणारी टोळी आलेली आहे अशा अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने संभ्रम निर्माण होत असून नागरीक देखील अशा अफवांवर विश्वास ठेवत आहेत.मात्र पोलीसांचे म्हणणे आहे की, मुले चोरणारी टोळी आलेली आहे ही अफवा असून या अफवंावर विश्वास कुणी ठेवू नये. तसेच कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये. जर गावामध्ये कुणी संशयित इसम, महिला फिरत असतांना मिळून आल्यास, काही अडचणी असल्यास त्याबाबत पोलीस स्टेशनला फोन करून माहिती द्यावी.

गेल्या वर्षी पालघर आणि गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यात अविचाराने पसरवलेल्या अफवांमुळे संतापजनक घटना घडून मोठा अनर्थ घडला. त्याची पुनरावृत्ती आपल्या गाावांमध्ये होवू नये म्हणून पोलीस यंत्रणा सजग झाली आहे. या स्थितीत निराधार अफवा व मेसेस कोणी व्हायरल करू नये.अन्यथा संबंधीतांवर कडक कारवाई केली जाईल अशी तंबी पोलीसांनी दिली आहे. सोशल मीडियावर आलेल्या मेसेजची खात्री न करता तसाच फॉरवर्ड व्हायरल केल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची श्नयता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Sakal Exclusive : वन्यजीव अवयव विक्रीचे नाशिक बनले केंद्र; 8 महिन्यात 6 घटना

विविध व्हॉटसअप गृप व फेसबुकवर मुलाच्या अपहरणाबाबत फिरत असलेल्या मेसेजबाबत पोलीस विभागाने खात्री केली असता असा कोणताही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत पोलीस विभागही सोशल मीडियावर लक्ष ठेवून असून कोणीही अशा निराधार अफवा, मेसेज व्हायरल करून समाजात भीतीयुक्त वातावरण निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास त्याचेविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मेहूणबारे पोलीसांनी दिला आहे.

दरम्यान आठ दिवसापूर्वी सेवानगर तांंडा (ता.चाळीसगाव) येथे गावातील काहींनी एका वेडसर महीलेला मुले चोरणारी असल्याच्या संशयावरून तिला मारहाण झाली आहे. यावेळी मेहुणबारे पोलीस वेळेवर पोहचले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

"मेहुणबारे परीसरात कुठेही अशी घटना झालेली नाही. कुणीही अफवांना बळी पडु नये याबाबत आता याबाबत गावागावात जावून जनजागृती केली जाणार आहे.गावात कुणीही संशयास्पद व्यक्ती फिरतांना दिसल्यास आम्हाला कळवावे कुणीही कायदा हातात घेऊ नये."

- विष्णू आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेहुणबारे (ता.चाळीसगाव)

हेही वाचा: ग्रामीण भागात पुन्हा ‘चुली’वर स्वयंपाक; का ते जाणुन घ्या...

Web Title: Rumors Of Gangs Abducting Children Fake News In Rural Areas Police Action Warning Latest Crime Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..