Success Story : छंद बनले ‘पॅशन’ अन्‌ ‘ग्लॅमरस’ फॅशन क्षेत्राला गवसणी; रूपा शास्त्रींची यशोगाथा!

Jalgaon
Jalgaonesakal

जळगाव : ‘पॅशन’ला ‘हार्डवर्क’ची जोड दिली अन्‌ नशिबानंही या सूत्राला हात दिला, की राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ग्लॅमरस फॅशन’च्या झगमगत्या क्षेत्रालाही गवसणी घालता येते. या यशाला मग वयाचीही मर्यादा उरत नाही. (Rupa Shastri has been invited as chief guest at Lakme Fashion Show at BKC in Mumbai jalgaon news)

होय, रूपा शास्त्री हे मॉडेलिंगच्या क्षेत्रातलं असंच एक लौकिकप्राप्त नाव. अनेक फॅशन शोच्या विजेत्या, ब्रॅन्डेड कंपन्यांच्या ब्रॅन्ड ॲम्बेसेडर, स्पर्धांच्या समन्वयक असलेल्या रूपा शास्त्री यांना गुरुवारी (ता. ९) मुंबईतील ‘बीकेसी’त होणाऱ्या भारतातील सर्वांत लोकप्रिय व नामांकित ‘लॅक्मे फॅशन शो’त प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलंय.

जळगावसारख्या लहानशा शहरातूनही फॅशनच्या ग्लॅमरस दुनियेत नाव कमावता येते, हे रूपा यांनी त्याच्या यशाने सिद्ध केलंय. त्यांची ही यशोगाथा, म्हणूनच महिला दिनी अन्य भगिनींसाठी प्रेरणादायी ठरावी.

कोरोना काळातील संधी

जळगावातील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या सचिव, आर्वी एंटरटेन्मेंटच्या संस्थापक म्हणून रूपा शास्त्री यांची ओळख. वाणिज्य शाखेच्या पदवीधर. कोरोना काळाने अनेकांच्या संधी हिरावल्या, तशा काहींना नव्याने संधी निर्माणही करून दिल्या.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Jalgaon
Jalgaon News: राष्ट्रवादीतर्फे खोक्यांची होळी करून महागाईचा निषेध; कापूस, कांद्याला भाव देण्याची मागणी

अशा नशिबवानांमध्ये रूपा यांचा समावेश होता. कोविड काळात त्यांनी ‘मिसेस इंडिया शो’साठी ऑडिशन दिली अन्‌ त्यांची निवड झाली. या क्षेत्रातली ‘एबीसीडी’ही माहीत नसताना त्यांनी पुढचं पाऊल टाकलं.

फॅशन आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात आवड म्हणूनही काही करायचं, तर या क्षेत्रातील किमान ज्ञान आवश्‍यक होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीत एक क्लास जॉइन केला. त्यात मेकअपपासून रॅम्प वॉक, बोलण्या-चालण्याची लकब, उत्तरे द्यायची शैली आदी बाबी आत्मसात केल्या आणि त्यांचा मॉडेलिंगच्या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

मागे वळून पाहिलेच नाही

एकामागून एका चांगल्या कंपन्यांच्या, मासिकांच्या ऑफर्स त्यांना येऊ लागल्या. काही कंपन्यांनी ब्रॅन्ड ॲम्बेसेडर केले. अनेक फॅशन शोमध्ये सहभागी होऊन त्या ‘टॉपर’ ठरल्या.

Jalgaon
Jalgaon News : घर सोडून प्रेयसी धडकली जळगावात; ऐन लग्नघटिका समीप अन...

टायकूनसारख्या नामांकित मासिकांच्या मुखपृष्ठावर त्यांच्या प्रतिमा झळकू लागल्या आणि मग रूपा शास्त्रींनी कधी मागे वळून पाहिले नाही.

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा, शोमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व करून विविध स्पर्धांचे विजेतेपद, फॅशन क्षेत्रातील विविध पुरस्कारही मिळवलेत. ‘टी-सीरीज’च्या ‘साधना सरगम’साठी त्यांची निवड झाली. ‘जिंदगी तू ना आजमा’ या अल्बमसाठी, बी. बी. बांठिया ज्वेलर्स, पनाशसाठी त्यांनी मॉडेल म्हणून शूट केले. ‘सुपर मॉम’ म्हणूनही नामांकित कंपनीकडून त्यांचा गौरव झालांय.

‘तेरा साथ है तो...’

या प्रवासात कुटुंबातून पती डॉ. विजय, सासू-सासरे, मुलांनी मनापासून सहकार्य केले. इथला व्यवसाय आणि काम बघताना मॉडेलिंगच्या क्षेत्रात मर्यादित कामच मी स्वीकारलेय. ‘आपण छोट्या गावात राहतो. त्यामुळे आपल्याला काही करता येत नाही, हा समज चुकीचा आहे’, असे रूपा आवर्जून सांगतात.

Jalgaon
Jalgaon News: अबब! मतदारयाद्यांत दीड लाखांवर फोटो अस्पष्ट, खरा मतदार ओळखायचा कसा? असे करा अपडेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com