सचिन तेंडूलकरने लहानग्या अनयला स्वाक्षरीसह पाठवले पत्र

अनयला सचिन तेंडूलकरने स्वाक्षरी केलेल्या संग्रहातील आवडत्या छायाचित्रांसह लेटरहेडवर शुभेच्छासंदेश
अनयला सचिन तेंडूलकरने स्वाक्षरी केलेल्या संग्रहातील आवडत्या छायाचित्रांसह लेटरहेडवर शुभेच्छासंदेशesakal
Updated on: 

जळगाव : ‘मोठी स्वप्न पाहा.. ती पूर्ण करण्याच्या दिशेने कठोर परिश्रम करा.. यश हमखास मिळेल.. हा अनुभव मी घेतलांय, तूदेखील तशी वाटचाल कर..’ हा संदेश आहे क्रिकेटप्रेमींचं दैवत असलेल्या सचिन तेंडूलकरचा. जळगावच्या लहानग्या अनय डोहोळेला त्याने पत्र पाठवून हा संदेश दिलाय.

अनयला सचिन तेंडूलकरने स्वाक्षरी केलेल्या संग्रहातील आवडत्या छायाचित्रांसह लेटरहेडवर शुभेच्छासंदेश
ब्रेंडन मॅक्युलमची इंग्लंडवर जादू; स्लिपमध्ये 1-2 नव्हे 6 क्षेत्ररक्षक

पहिलीत शिकणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरड्या जळगावच्या अनय डोहोळे याने सचिनला स्व-हस्ताक्षरात पत्र लिहून त्यांचे छायाचित्र व स्वाक्षरी पाठवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. आणि खरच अनयच्या या बालहट्टाला प्रतिसाद देत सचिन तेंडुलकरने स्वतःची स्वाक्षरी असलेले विश्वचषक हातात घेतलेले व शतक झळकविलेल्या नंतर अभिवादन करतानाचे छायाचित्र त्यास पाठविले. सोबत स्वतःच्या लेटर पॅडवर अनुभव शेअर करीत ‘मोठे स्वप्न पाहा त्यासाठी कठोर परिश्रम करा, यश हमखास मिळेल..’ असा संदेशही दिला आहे. अनय अनघा व अजय डोहोळे यांचा मुलगा असून वाघनगर येथील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम शाळेचा विद्यार्थी आहे.

अनयला सचिन तेंडूलकरने स्वाक्षरी केलेल्या संग्रहातील आवडत्या छायाचित्रांसह लेटरहेडवर शुभेच्छासंदेश
केंद्राचे खेलो इंडिया तर राज्याचे 'महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com