Sakal Impact : पाचोरा येथे रेल्वे भुयारी मार्गातील खड्डे बुजविले; सकाळच्या दणक्यानंतर पालिकेकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Workers working on filling potholes in railway subway.

Sakal Impact : पाचोरा येथे रेल्वे भुयारी मार्गातील खड्डे बुजविले; सकाळच्या दणक्यानंतर पालिकेकडून दखल

पाचोरा (जि. जळगाव) : येथील भडगाव रोड (Bhadgaon Road) भागातील राजे संभाजी रेल्वे भुयारी मार्गातील जीवघेणे खड्डे पालिका प्रशासनाच्यावतीने बुजविण्यात आले असून, यासंदर्भात 'सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केल्याने 'सकाळ'चे कौतुक होत आहे. (sakal impact after publishing news by newspaper about Pit Municipal Administration filled potholes jalgaon news)

जुने व नवे गाव यांना जोडणाऱ्या व सतत वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गात खड्डे पडून त्यांची लांबी, रुंदी व खोली दिवसागणिक वाढत होती.

दुचाकी चालकांचे अपघात व जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत होते. त्यामुळे हे खड्डे बुजवावेत, अन्यथा खड्ड्यातच बसून उपोषण आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले यांनी दिला होता.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्या संदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी या वृत्ताची दखल घेऊन पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, अभियंता मधुकर सूर्यवंशी यांना या संदर्भात कार्यवाही

करण्याचे आदेशित केल्यानंतर मध्यरात्री खड्डे बुजविण्याचे काम पालिकेने हाती घेतले व पूर्ण केले. त्यामुळे संभाव्य अपघात व हानी टळली असून, खड्ड्यात बसून उपोषण करण्याचा इशारा देणारे अनिल येवले व या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या 'सकाळ'चे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.