परभणीच्या अल्पवयीन मुलीची जळगावात विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newsesakal

जळगाव : परभणी येथील सतरावर्षीय मुलीला कुसुंबा (ता. जळगाव) येथे प्रौढ व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करून विवाह लावण्याचा प्रकार करीत असल्याची बाब उघडकीस आली. पीडितेला बालकल्याण समितीच्या स्वाधीन केल्यावर तिने दिलेल्या जबाबावरून दोन महिलांसह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात मानवी तस्करी आणि विक्री प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Sale of Parbhani minor girl in Jalgaon case has been registered against four Jalgaon Latest Crime News)

Jalgaon Crime News
कडकडणाऱ्या विजांचे लोळ, गारांसह मध्यरात्री पर्यंत ढगफुटीचा तुफानी पाऊस

गंगाखेड (ता. परभणी) येथील सतरावर्षीय दिव्या (काल्पनिक नाव) या पीडितेच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. पीडितेच्या काकाच्या घरात भाड्याने खोली घेऊन वास्तव्यास असलेल्या लक्ष्मी मावशी नावाच्या महिलेने पीडितेच्या आईला तिला स्थळ दाखविण्यासाठी नेत असल्याचे सांगत औरंगाबादमार्गे जळगाव गाठले.

शहरालगत कुसुंबा गावात एका प्रौढ व्यक्तीसोबत मुलीचे बळजबरी लग्न लावून देण्याचा प्रकार केला. ही बाब समजताच घटनास्थळी पोलिस धडकले. पोलिस येत असल्याचा संशय संशयितांना येताच संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेत बालकल्याण समितीच्या स्वाधीन केले.

बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पीडितेशी संवाद साधत घडल्या प्रकाराची माहिती घेत लेखी जबाब लिहून घेतला. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांत संशयित लक्ष्मी मावशी, तिचा दीर व देराणी, लक्ष्मी मावशीच्या दीराचा शालक अशा चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. उपनिरीक्षक दीपक जगदाळे पुढील तपास करीत आहेत. पोलिस संशयितांच्या मागावर असून, त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी सांगितले.

Jalgaon Crime News
गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गातील बदल; जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com