Jalgaon News : सैनिकी परंपरा असलेले सामनेर गाव

samner village
samner villageesakal

स्वातंत्र्यलढ्यापासून आज तगायत देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांचे गाव म्हणून पाचोरा तालुक्यातील सामनेर गावाची ओळख आहे. अवघ्या पाच हजारावर लोकसंख्या (Population) असलेल्या या गावात आजी -माजी सैनिकांची संख्या ३०० वर आहे. (Samner village with military traditions with population of village is over 5 thousand number of ex servicemen is over 300 jalgaon news)

सैनिकी परंपरा असलेले
सामनेर
सैनिकी परंपरा असलेले सामनेरesakal

गावातील सैनिकांचे व अनेकांचे योगदान स्वातंत्र्याच्या लढ्यात होते. देशभक्तीची ही परंपरा आजही गावातील तरुण जोपासत आहेत. - महेंद्र एम साळुंखे, सामनेर (ता.पाचोरा)

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गावात पूज्य साने गुरुजींनी इंग्रजांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने गावात सभा घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात तरुणांना सहभागी करून घेतले होते. त्यातून ब्रिटिशांच्या विरोधात मोठी फळी तयार झाली.

त्यातील गावातील बंडू लोहार, जगन्नाथ सोनीराम पाटील, डॉ. पी. टी. वाणी, भिला चिंधू पाटील यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांची फळी उभी राहिली. ब्रिटिश शासनाच्या विरोधात या सर्वांनी मध्य रेल्वेच्या तारा तोडणे, रेल्वे वाहतुकीचे रूळ तोडणे व वाहतूक विस्कळित करणे यासारख्या कारवाया केल्या होत्या.

ज्यामुळे अनेकांना कारागृहात शिक्षा भोगावे लागली. कालांतराने १९४७ ला आपल्या देशाला स्वतंत्र मिळाले. स्वातंत्र्य लढ्याची हीच परंपरा कायम ठेवत गावातील तरुण स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात भरती होण्याकरिता गावातील तरुणांचा ओढा कायम होता. सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणावर गावातील तरुण सैन्य दलात शिपायापासून ते सुभेदार, कॅप्टनपदापर्यंत कार्यरत आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

samner village
Eknath Shinde | कामांतून विरोधकांना उत्तर देतोय : एकनाथ शिंदे

यातील अनेक जण निवृत्त होऊन माजी सैनिक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. महाराष्ट्र पोलिस दल व विविध क्षेत्रात नोकरी करत आहेत. गावातील ज्यांनी स्वातंत्र लढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला, त्यांची प्रेरणा आजही मिळते. आजही गावातील ३०० चे वर तरुण भारतीय सैनिक दलात तसेच सशस्त्र सीमा बल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व पोलिस फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रिअल फोर्स, इंडो तिबेट पोलिस फोर्स व महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत आहेत.

सामनेर येथील सैनिकांच्या कारगिलच्या लढ्यात देखील जवानांचा सहभाग प्रत्यक्ष होता. मागील पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेले जवान चंदू चव्हाण हे देखील सामनेर येथील रहिवासी आहेत.

सामनेर येथील सैनिकी परंपरेमागे येथील महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात १८ महाराष्ट्र बटालियनतर्फे एनसीसीसाठी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याने अगदी लहान वयामध्ये विद्यार्थ्यांना जणू काही आपल्या अंगावर अशी वर्दी असावी, असे एनसीसी माध्यमातून जणू धडे मिळत आहेत.

सैन्यात इच्छुक असल्याने सामनेर येथील एनसीसी चे प्रमुख (कै.) एफ. बी. पाटील व (कै.) एल जी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत होते. आजही महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात व्यायामशाळेत विद्यार्थी सैन्य भरतीची तयारी करत असताना तरुणांना गावातील माजी सैनिक यांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थी तयारी करतात. माजी सैनिकांनी देखील या तरुणांना मार्गदर्शन केल्याने त्याचा लाभ झाला आहे.

samner village
Farmer Study Tour : महाराष्ट्रातील जमिनीत चांगल्या हळदीचे उत्पादन शक्य : डॉ. निर्मल बाबू

देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मानसिकता वाढल्याने भारतीय सैन्यदलात गावातील तरुणांची संख्या वाढली आहे. गावातील सैनिकी परंपरा पाहून व शिक्षणाची सोय असल्याने गावकऱ्यांचे नातेवाईक सामनेर येथे शिक्षणासाठी व सैन्य भरतीचे सराव करण्यासाठी राहतात व सैन्यामध्ये भरती झालेले आहेत.

सामनेर सारख्या छोट्याशा गावात देशभक्तीच्या अंकुराचे मोठ्या रूप त्यात व त्यातून वृक्षांत रूपांतर होत आहे. सामनेर गावात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाव, या उद्देशाने १९५७ या वर्षी गावात महात्मा गांधी विद्यालय सुरू झाल्याने गावातील व परिसरातील जवळजवळ २२ खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाली होती, हे विद्यालय सुरू करण्यात ह.भ.प. रामकृष्ण मोतीराम पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.

गावासाठी सर्वस्व दान करणाऱ्या या परमभक्तांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यातील गरज होती गावात हायस्कूल व्हावे, यासाठी प्रयत्न केले येथील भिला चिंधू पाटील यांनी स्वतःची जमीन विद्यालयासाठी दिली.

येथील चिंतामण नारायण पाटील, जगन्नाथ सोनीराम पाटील, डॉ. पी. टी. वाणी, बाजीराव बाबूराव चव्हाण, भिला हरी पाटील, माधवराव जानजी पाटील, धनराज शंभु पाटील, तुकाराम हिराजी पाटील, तत्कालीन पोलिस पाटील माधवराव हरी पाटील अशा सर्वांनीच हायस्कूलसाठी केलेले प्रयत्न आजही प्रेरणादायी आहेत.

samner village
Jalgaon News : MIDCत एकाच्या डोक्यात हाणला दगड

या सर्वांच्या प्रयत्नामुळेच आज गावात शिक्षणाची गंगा वाहू लागली. १९५७ पासून माध्यमिक विद्यालय, १९९३ पासून कनिष्ठ महाविद्यालय व २००१ पासून देवराम चिंतामण पाटील यांच्या प्रयत्नातून वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले होते.

शिक्षण व व्यायामाची सोय शाळेच्या प्रांगणात उपलब्ध झाल्यामुळे या विद्यालयातून शिक्षण घेतलेले आणि तरुण आज समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने कामाचा ठसा उमटत आहे.

या सर्वांच्या माध्यमातूनही देशसेवेची प्रेरणा येणाऱ्या पिढीला मिळत आहे. सामन्याची प्रगती होण्याला गावातील विविधस्तरातील मान्यवरांचे योगदान जसे कारणीभूत आहे, तसेच येथील तरुणांचा देखील तेवढाच वाटा आहे. त्यामुळे सामनेर गाव विकासाच्या दिशेने झपाट्याने पाऊल टाकत आहे.

सैनिकी परंपरा कायम असून सैन्य दलातील तसेच पॅरा मिलिटरी फोर्स व पोलिस दलात दरवर्षी गावातील तरुण भरती होत राहतात. ही परंपरा आजही कायम राहिले आहे म्हणून सामनेर हे गाव सैनिकांची परंपरा असलेले गाव म्हणून जिल्ह्यात परिचित झालेले आहे.

samner village
Eknath Shinde | पारोळा, एरंडोल येथे ‘MIDC’साठी प्रयत्न : मुख्यमंत्री शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com