Eknath Shinde | पारोळा, एरंडोल येथे ‘MIDC’साठी प्रयत्न : मुख्यमंत्री शिंदे

cm eknath shinde
cm eknath shindeesakal

पारोळा (जि. जळगाव) : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह एरंडोल व पारोळा तालुक्यात एमआयडीसी मंजुरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. (cm eknath shinde statement about midc approval jalgaon news)

बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे हे सर्वसामान्यांचे सरकार असून, पहिल्या दिवसापासून खांद्याला खांदा लावून आमदार चिमणराव पाटील आपल्यासोबत आहेत, असे गौरोदगारही त्यांनी काढले.पारोळा व एरंडोल शहरातील विविध ११५ कोटींच्या विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते.

यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री बंदरे व खनिज कर्म मंत्री दादा भुसे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार लताबाई सोनवणे,

माजी आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्ष करण पाटील, माजी नगराध्यक्ष नलिनी पाटील, मृणाल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, किशोर काळकर यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा, तालुका शहर व शाखा पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, एरंडोल तालुक्यातील अंजनी व पद्मालय प्रकल्पासाठी सुप्रमा अदा करण्यात आली असून, डार्कझोनमध्ये असलेले दोन्ही तालुके वगळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली..तसेच कापसाला योग्य भाव, एरंडोल व पारोळा तालुक्यासाठी ‘पोखरा’ अंतर्गत सकारात्मक निर्णय,

cm eknath shinde
Eknath Shinde | कामांतून विरोधकांना उत्तर देतोय : एकनाथ शिंदे

निम्न तापी प्रकल्प तसेच पाळडसे धरण, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यासह एरंडोल विधानसभेत जास्तीत जास्त निधी देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. आज हजारो जनतेच्या साक्षीने ११५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत असून, येणाऱ्या काळात देखील जास्तीत जास्त निधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कापसाला भाव मिळावा : आमदार चिमणराव पाटील

मागील वर्षी शेतकऱ्यांना पंधरा हजारापर्यंत प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळाला होता. मात्र यंदा कापसाला भाव सात ते आठ हजारापर्यंत भाव असल्याने शेतकरी असमाधानी आहे. यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करत हमीभाव तसेच वायदे बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १२ हजारापर्यंत कापसाला भाव मिळावा,

यासाठी राज्य सरकारने देखील प्रयत्न करावे, अशी मागणी या वेळी आमदार चिमणराव पाटील यांनी केली. तसेच पोखरा योजना, मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न,

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

cm eknath shinde
Farmer Study Tour : महाराष्ट्रातील जमिनीत चांगल्या हळदीचे उत्पादन शक्य : डॉ. निर्मल बाबू

विजेचे प्रश्न यासह प्रलंबित प्रश्नांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, एरंडोल व पारोळा शहरातील जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून, मतदारसंघात विकासाची गंगा पुढील अडीच वर्षात देखील अशीच सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात आमदार चिमणराव पाटील यांच्या विकासकामांचे अभिनंदन करत येणाऱ्या काळात देखील राज्य सरकार जिल्ह्यात भरीव निधी जाहीर करेल.

येणाऱ्या काळात जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वास येऊन सिंचनाचे प्रश्न मार्गी लागतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, ११५ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन आधुनिक पद्धतीने रिमोटचे बटन दाबून करण्यात आले.जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी आभार मानले.

cm eknath shinde
Jalgaon News : MIDCत एकाच्या डोक्यात हाणला दगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com