Latest Marathi News | जळगाव : महसूल पथक दिसताच वाळूचोरटे ट्रॅक्टरसह पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sand illegal transportation in jalgaon

जळगाव : महसूल पथक दिसताच वाळूचोरटे ट्रॅक्टरसह पसार

जळगाव : नागझिरी (ता. जळगाव) शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक करताना तीन ट्रॅक्टर आढळले. जळगाव महसूल विभाग कारवाई करताना दिसल्याने ट्रॅक्टरचालकांनी रस्त्यातच वाळू खाली करून वाहने घेत पसार झाले. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: पोलिस विभागात चहापेक्षा किटली गरमचा अनुभव; हजेरीमास्तरची कर्मचाऱ्याला दमबाजी

गिरणा नदी पात्रातून बेकायदेशीररीत्या वाळूची मोठ्या प्रमाणावर उत्खनन आणि वाहतूक सुरु आहे. वारंवार तक्रारीवरूनही वाळूचोरीवर प्रशासन निर्बंध लादू शकलेले नाही. जळगाव तहसील कार्यालयाचे मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, अशिष वाघ, दिनेश उगले, अजिंक्य आंधळे, रमेश वंजारी, मोहाडी तलाठी सारीका दुरगंडे, धामणगाव तलाठी रवींद्र घुले, तरसोद तलाठी अनिरूध्द खेतमाळस, खेडी खुर्द तलाठी रूपेश ठाकूर, पिंप्राळा तलाठी संदीप डोभाळ यांनी नागझीरी शिवारातील गिरणा नदी पात्रात धडक देत कारवाईस सुरवात केली. महसुलचे पथक कारवाई करत असतानाचे दुरूनच दिसत असल्याने वाळू चोरुन नेणाऱ्या तीन ट्रक्टरचालकांनी त्यांना पाहून पळ काढला.

हेही वाचा: टॉयलेट घोटाळा प्रकरणातील सर्व संशयितांना 20 पर्यंत कोठडी

पाठलाग करू नये म्हणून...

महसूल पथकाने ट्रॅक्टरच्या दिशेने कूच केल्याचे पाहून ट्रक्टर चालकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील वाळू रस्त्यावरच खाली करून पथकाचा रस्ता अडवला. नंतर ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेऊन पसार झाले. याप्रकरणी पिंप्राळा मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरमालक गजानन सोनवणे उर्फ मेजर सोनवणे (रा. मोहाडी रोड, जळगाव), देविदास ढेकळे (रा. मोहाडी रोड), संदीप सपकाळे (रा. मोहाडी, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक अनिल मोरे करीत आहे.

Web Title: Sand Illegal Transportation In Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top