
जळगाव : गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करुन नेणाऱ्या ट्रॅक्टरमालक व चालकाविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायालयाने पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गिरणा नदीपात्रातून (एमएच १९ झेड ४७३६) आणि (एमएच १९ झेड ५२७५) दोन्ही डंपर वाळूची चोरी करुन नेत असताना म्हसावद (ता. जळगाव) महसुलच्या गस्ती पथकाला ५ सप्टेंबर २०१७ रोजी मध्यरात्री दीड वाजता मिळून आले होते.
तलाठी मनोहर बाविस्कर यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन डंपरचालक जनार्दन सखाराम कोळी आणि बळवंत लक्ष्मण पाटील (मयत) यांच्याविरुद्ध गौणखनीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (Sand thief fined in Proved crime in district court Jalgaon crime Latest Marathi News)
तपासाधिकारी सहाय्यक फौजदार जितेंद्र राठोड यांनी या प्रकरणी तपास पूर्ण करुन वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एस. देशमुख यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु होते.
सरकारी अभियोक्ता ॲड. रंजना पाटील यांनी १० साक्षीदारांच्या साक्ष न्यायालयात नोंदवून घेतल्या. प्राप्त दस्तऐवज आणि साक्षीदारांच्या साक्ष अचूक तपासातून संशयितांविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने कलम-३७९/३४ अन्वये ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.