पुणे- नगरच्या नागरिकांच्या नशिबी घोड नदीतून जीवघेणा प्रवास

chinchni bori.jpg
chinchni bori.jpg

न्हावरे (पुणे) : चिंचणी (ता. शिरूर) व बोरी (ता. श्रीगोंदा) दरम्यान, पुणे व नगर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या घोड नदीपात्रात पुलाची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना धोकादायक पद्धतीने होडीतून प्रवास करावा लागत आहे. गरज व मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने येथील नदीपात्रात पूल बांधावा, अशी मागणी दोन्ही तालुक्‍यातून होत आहे.

शिरूर तालुक्‍यातील न्हावरे, गुनाट, निमोणे, निर्वी, चिंचणी आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील बोरी, हंगेवाडी, चिंबळे आदी परिसरातील ग्रामस्थांची सातत्याने नदीपात्रातून ये-जा असते. नदीपात्रावर बैठा नळ्यांचा पूल आहे. मात्र, त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून पुलाची व नजीकच्या रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक चालू केली होती.

मात्र, आता मागील आठवड्यापासून घोड नदीला पाणी आल्यामुळे पूल व रस्ता पाण्याखाली गेला आहे. सध्या पुलावरून पाच फुटांपेक्षा अधिक पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. ग्रामस्थ सध्या ये-जा करण्यासाठी गरज म्हणून धोकादायक पद्धतीने होडीमधून प्रवास करत आहेत. 
 

पावसाळ्यात दरवर्षी नदीला पाणी आल्यावर पाणी कमी होईपर्यंत दोन-तीन महिने दोन्ही तालुक्‍यातील ग्रामस्थांची कुचंबणा होते. तरी नदीपात्रावर पूल व्हावा यासाठी शिरूर हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार व श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे सामूहिकपणे प्रयत्न करणार आहे. 
- नामदेव पवार, उपसरपंच 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com