Latest Marathi News | चंदन तस्करांचा वन कर्मचाऱ्यांवर गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदन तस्करांचा वन कर्मचाऱ्यांवर गोळीबार

चंदन तस्करांचा वन कर्मचाऱ्यांवर गोळीबार

मेहुणबारे/चाळीसगाव : पाटणा जंगलात चंदनाच्या वृक्षांची कत्तल करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. तस्करांनी वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर कुऱ्हाड मारुन फेकत गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला व तेथून पळ काढला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: मनपाने 48 कोटींची रक्कम 2 महिन्यांत जमा करावी; औद्योगिक न्यायालयाचे आदेश

पाटणा जंगलात चंदनाची झाडे तोडणाऱ्या टोळीला हटकणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर चोरट्यांनी हल्ला केल्याचा थरारक प्रकार शुक्रवारी (ता.१६) रात्री घडला. पाटणा वनक्षेत्रात जंगल संवर्धन व संरक्षणासाठी वनरक्षक रहीम तडवी व दैनंदिन संरक्षण मजूर नागो आगीवले, नवशीराम मधे, अशोक आगीवले, रंगनाथ आगीवले, गोरख राठोड, मेघनाथ कैलास चव्हाण यांचे पथक शुक्रवारी (ता.१६) पाटणा परिमंडळातील पाटणा कक्ष क्रमांक ३०३ मध्ये गस्त घालत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास भिल पायरी/इनाम खोरा भागात पथकाला वृक्षतोड होत असल्याचा आवाज आला.

हेही वाचा: Lumpy Disease : जळगाव जिल्हा ठरला ‘Hotspot'; 122 जनावरे मृत्यूमुखी

आवाजाच्या दिशेने गेले अन्...

पथक सावकाशपणे आवाजाच्या दिशेने गेले असता पाच अनोळखी व्यक्ती चंदन प्रजातीचे वृक्ष करवत व कुऱ्हाडीच्या साहाय्याने चोरी करण्याच्या उद्देशाने कापताना, तोडताना दिसून आले. वन विभागाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेगवेगळ्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. वनरक्षक रहीम तडवी हे एका तस्कराच्या मागे धावले असता तो टेकडीवर चढला व तेथून त्याने कुऱ्हाड व दगड मारून फेकले. त्यापैकी एक दगड नागो आगीवले यांच्या पायाला लागला.

हेही वाचा: Jalgaon : ते, आले..अन्‌ कारवाई करत न बोलता निघूनही गेले..!

पथकाने केला पाठलाग

पथकाने या चोरांचा पाठलाग सुरूच ठेवला. त्यावेळी त्यांच्यातील एकाने आपल्या जवळील गावठी कट्टा काढून दोन वेळा वन पथकाच्या दिशेने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. त्याचवेळी जोरात पाऊस पडत असल्याने व झाडांचा आसरा घेत ते चोरटे पळून गेले. पथकाने चंदन वृक्षतोड होत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी चंदन प्रजातीची सहा झाडे तोडलेल्या अवस्थेत दिसून आली. तसेच पाच लिटरची कॅन गावठी दारूने भरलेली, एक लहान करवत ब्लेड, नॉयलॉनची पिशवी, एक चंदन ठोकळा, चप्पल, प्लास्टिक वाटी असे साहित्य मिळून आले. हे सर्व साहित्य पथकाने जमा करून या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. या प्रकरणी वनरक्षक रहीम तडवी यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याला पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sandalwood Smugglers Firing On Forest Personnel Latest Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..