Jalgaon News : सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेतर्फे सत्कार; महापौर, उपमहापौर, आयुक्तांनी केले कौतुक

Mayor, Deputy Mayor, Commissioner etc. along with felicitated employees.
Mayor, Deputy Mayor, Commissioner etc. along with felicitated employees. esakal

Jalgaon News : शहरातील फुकटपुरा भागातील घरांमध्ये ६ जुलैला पावसाचे पाणी शिरले होते. या भागातील मोठा नाला व भुयारी गटारीत कचरा मोठ्या प्रमाणात अडकल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले होते.

पाऊस सुरू असतानाच जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात शिरून नाल्याची व भुयारी गटारीचे सफाई युद्धपातळीवर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार महापालिका प्रशासनाने केला.

पहिल्याच पावसात इच्छादेवी चौफुलीजवळील फुकटपुरा नाल्याचा पाईप चोकअप झाल्यामुळे तांबापुरा व फुकटपुरा भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. (Sanitation employees felicitated by Municipal Corporation jalgaon news)

त्यामुळे नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागले होते. घरातील अन्नधान्यासह संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उदय पाटील यांच्या सुचनेवरून आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे व कर्मचाऱ्यांनी नाल्याचा पाईपचा प्रवाह मोकळा करण्यासाठी जीवाची बाजी लावून काम केले.

यात कर्मचाऱ्यांनी आठ आठ तास काम करून नाल्याच्या पाईपमधील गाळ व कचरा बाहेर काढला. ही मोहीम सलग पाच दिवस सुरू होती. यात तब्बल ४० तास काम करून कर्मचाऱ्यांनी पाईपचा प्रवाह मोकळा केला.

या कामासाठी आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागेश लोखंडे, युनिटप्रमुख सतीश करोसिया, मुकादम प्रभाकर सोये, वॉटरग्रेस कर्मचारी नितीन जगझाप, फायर ऑफिसर शशिकांत बारी, अग्निशमन कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mayor, Deputy Mayor, Commissioner etc. along with felicitated employees.
Jalgaon Road Damage : दीडच वर्षांत चौपदरी महामार्गाची ‘वाट’; 7 किलोमीटर टप्प्यात खड्डेच खड्डे

यांचा झाला सत्कार

आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे, सतीश केरोसिया, आनंदा सोनवणे, आधार वाघ, गौतम सोये, विश्वास मोरे, किरण सोये, राजेश कदम, सागर सोनवणे, मिलिंद सोनवणे, धनराज सपकाळे, अक्षय थोरात, दिनेश बिऱ्हडे, रितेश वाघ, भागवत नन्नवरे, संतोष सोनवास, मोहन बिऱ्हाडे, मंगल बिऱ्हाडे, सुपडू खुले, अंकुश साळवे, प्रभाकर सोये.

आयुक्तांनी दिले ११ हजाराचे बक्षीस

फुकटपुऱ्यात पावसाच्या पाण्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून काम केल्याचे कौतुक म्हणून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी या टीमला ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले.

Mayor, Deputy Mayor, Commissioner etc. along with felicitated employees.
Jalgaon NMU News : बहिणाबाई चौधरी, साने गुरुजींच्या नावाने शिष्यवृत्ती; संशोधनास मिळणार प्रोत्साहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com